शिकारी खूद यहाॅं, शिकार हो गया?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सराकरमध्ये सहभागी न होण्याचे जाहीर केले होते...
Devendra Fadnavis Latest News
Devendra Fadnavis Latest News Sarkarnama

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट आला असून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धक्कादायक घोषणा करत पुन्हा एकदा नवा डाव खेळला आहे. शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी साडेसात वाजता शपथ घेतली. मात्र, या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे असणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी फडणवीस यांनी या नव्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम पहाव, असा आग्रह केल्यानंतर त्यांनीही फडणवीस शपथ घेतली. शिवसेनेच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पदाची शिकार केलेले फडणवीस हेच तर शिकार झाले नाहीत ना, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.

दिल्लीतूनच एकनाथ शिंदे यांचे नाव अंतिम झाले होते. त्यामुळे शिंदे यांच्या मंत्रीमंडळात आपण राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे फडणवीस यांची प्रतिमा उंचावली. पण त्यानंतर लगेचच काही मिनिटांत पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीरपणे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असे सांगितले. त्यानंतर फडणवीस हे शपथविधीसाठी गेले.

राज्याचा एकदा मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती पुन्हा उपमुख्यमंत्री होण्याचा हा पहिलाच प्रसंग असणार आहे. फडणवीस यांची या पदाला सुरवातील पसंती नव्हती. दिल्लीतून फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा पत्ता कट तर झाला नाही ना, अशी शंका आता व्यक्त होत आहे. भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनाही याची कल्पना नव्हती. खुद्द फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर प्रदेशाध्यक्षपद द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी पण पक्षश्रेष्ठींनी मान्य केली आहे. त्यामुळे फडणीवस यांचे `डिमोशन`तर पक्षाच्या नेतृत्वाने केली नाही, ना अशी शंका आता व्यक्त होत आहे.

Devendra Fadnavis Latest News
`फडणविसांना वाटतंय की, सेनेचा काटा काढला; पण दिल्लीश्‍वरांनी त्यांचाच काटा काढलाय!`

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com