जुही चावलाच्या ट्वीटवर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले,अशा प्रकारच वक्तव्य करतांना...

Juhi Chawala tweet viral : आता सरकार बदललं आहे.
Devendra Fadnavis & Juhi Chawla Latest News
Devendra Fadnavis & Juhi Chawla Latest NewsSarkarnama

Juhi Chawala tweet : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला पुन्हा एकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. यावेळी जुहीने ट्वीटरच्या माध्यमातून मुंबईत पसरललेल्या दुर्गंधीवर भाष्य केलं आहे. दिवसेंदिवस आपण या दुर्गंधी आणि वायूप्रदूषणात जगलो आहोत, असं वाटत असल्याचा उल्लेख तीने केला आहे. यामुळे तिच्या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे.

दरम्यान, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आणि मुंबई सारख्या अंतरराष्ट्रीय शहरासंदर्भात असं सार्वत्रिक बोलणं योग्य नाही, असा सल्ला दिला आहे. (Devendra Fadnavis & Juhi Chawla Latest News)

Devendra Fadnavis & Juhi Chawla Latest News
राजकीय वातावरण तापलं..प्रहार कार्यकर्त्यांच्या भावना आरपारच्या; बच्चू कडू मुंबईला निघाले...

फडणवीस म्हणाले की, मुंबई सारख्या अंतरराष्ट्रीय शहरासंदर्भात असं सार्वत्रिक बोलणं योग्य नाही. मुंबई हे एक उत्तम शहर आहे. इन्फ्रा स्टकचरची कमतरता आहे. महानगर पालिकेतल्या भ्रष्टाचारामुळे काही अडचणी लोकांना सहन कराव्या लागतात. मात्र आता सरकार बदललं आहे.

मुंबईत आमच्या मुख्यमंत्र्यांनी सहा हजार काँक्रेट रस्ते बनवायला घेतले आहेत. आता मुंबई बदलणार आहे. त्यामुळे असं सरसकट मुंबईला बोलण हे चुकीचं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शहराबाबत अशा प्रकारच वक्तव्य एका सेलिब्रिटीने करताना थोडासा विचार करावा, अशा शब्दात त्यांनी जुहीला सुनावले आहे.

जुहीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, तुमच्यापैकी कुणी नोटीस केलं आहे का, ते म्हणजे हल्ली मुंबईची हवा किती खराब झालीय. आपण जेव्हा खाड़ीवरुन प्रवास करतो तेव्हा तर नाकावर हात ठेवून प्रवास करावा लागतो. किती दुर्गंधी सुटली आहे. प्रदुषित झालेलं पाणी वरळी आणि बांद्रयातून थेट मिठी नदीत जाते आहे. याचे आपल्याला काहीच वाटत नाही का,असा सवालही जुहीनं उपस्थित केला आहे. त्यामुळे तिच्या या ट्वीटची चांगलीच चर्चा झाली.

Devendra Fadnavis & Juhi Chawla Latest News
'दहशतवाद्यांच्या हाती नवीन तंत्रज्ञान पडणे चिंताजनक'

दरम्यान, जुहीच्या या ट्विटवरून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून. मुंबईतील प्रदुषणावर चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी देखील जुहीनं 5 जी नेटवर्क वरुन केलेल्या ट्विटमुळे तिला न्यायालयानं फटकारलं होतं. आता तिच्या या ट्विटवर खुद्द फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com