न्यायालयाच्या सुनावणीवर फडणवीस म्हणाले, आम्ही समाधानी पण...

Devendra Fadanvis| सर्वोच्च न्यायालयात आज राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी पार पडली.
देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

मुंबई : “सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजुंनी आपापले म्हणणे मांडले. संविधान पीठाचा हा विषय असल्याचं आमच्या जेष्ठ वकीलांनी सांगितलं. त्यामुळे तो संविधान पीठासमोर जाणे महत्वाचे आहे. सुनावणी दरम्यान मोठ्या खंडपीठाकडे सुनावणी वर्ग करायची की नाही, याबाबच दोन्ही बाजूंनी आपापल्या बाजूने प्रतिज्ञा पत्र द्यायचे आहे. पुढील सुनावणी १ तारखेला होणार आहे. त्यामुळे आता त्यावर जास्त बोलणं योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील बंडखोर आमदारांची अपात्रता, नव्या सरकारची वैधता, विधीमंडळातील कामकाज प्रक्रिया यावर सुनावणी झाली. दोन्हा बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी १ ऑगस्ट ही तारीख दिली. या सुनावणीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

<div class="paragraphs"><p>देवेंद्र फडणवीस</p></div>
Hingoli : सुभाष वानखेडे पुन्हा शिवसेनेत ; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

आजच्या सुनावणीवर आम्ही समाधानी आहोत. आमची केस मजबूत आहे. त्यामुळे न्यायलायाचा योग्य निर्णय आमच्या बाजूने होईल. तसेच परिस्थिती जैसे थे चा आदेश कशा संदर्भात आहे हे आधी तुम्हाला माहिती असले पाहिजे. अपात्रतेच्या नोटीस त्यांनी आम्हाला दिल्या आणि आम्ही त्यांना दिल्या. फक्त या अपात्रतेबाबत परिस्थिती जैसे थे, चा आदेश आहे. पण काही लोक चुकीची माहिती पसरवत असून यावर विश्वास ठेवू नका, असही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीसांसह माजी मंत्री छगन भूजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे नेते हरिश साळवे यांनी न्यायालयात वेळ वाढवून मागितल्यानंतर न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे. २७ जुलैपर्यंत संबंधित कागदपत्रं सादर करण्यास सांगण्यात आले असून हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करण्याचा मानस आहे. पण तसे आदेश दिलेले नाहीत. शिवसेनेतील काही आमदार दुसऱ्या पक्षात गेले असते तर बंडखोरी असती असे म्हणता आले असते, पण त्यांनी दूसरा कोणताही गट स्थापन केलेला नाही की इतर कोणत्या पक्षातही गेले नाही, असा युक्तिवाद केला.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या वकिल कपिल सिब्बल यांनी, शिवसेनेने व्हीप बजावल्यानंतर बैठकीत यायला हवे होते, गुवाहाटीत जाऊन निर्णय घेणं चुकीचं होतं, त्यामुळे अनेक प्रश्नांची गुंतागुंत झाली आहे. असा युक्तिवाद केल्यांच भूजबळांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in