Maharashtra Budget Session: अमृताकडे वळतो म्हणत फडणवीसांची कोटी; सभागृहात एकच हशा !

Funny Moments In Budget Session: बजेट सादर करताना विरोधाकांना चिमटे काढले
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Assembly Budget Session: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. कितीही किचकट विषय असला तरी ते सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दात विश्लेषण करतात. तसेच अधूनमधून विरोधकांना चिमटे काढणे, शालजोड्यातून विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेणे, मश्किल टिपण्णी करीत ते वातावरण हलकेफुलके ठेवतात. वेळप्रसंगी ते स्वतःवरही विनोद करतात. त्यांची ही भाषणशैली प्रेक्षकांना तासंतास खिळवून ठेवते. त्याची प्रचिती आज अर्थसंकल्प सादर करताना पुन्हा एकदा आली.

Devendra Fadnavis
Maharashtra Budget : शिक्षण सेवकांसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ; बस तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत

देशात सध्या अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प पाच ध्येयावर आधारित असा पंचामृत असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.

पंचामृत ध्येयातील पहिले ध्येय हे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी हे आहे. दुसरे महिला, अदिवासी, मागासवर्गीय, ओबीसी आदी सर्व वंचीत सामजाघटकांचा विकास हे आहे. तिसरे ध्येय म्हणजे भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधांचा विकास, चौथ्या ध्येयात सक्षमरोजगार निर्मिती तर सरकारचे पाचवे ध्येय पर्यावरणपूरक विकास हे आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात मोठी घोषणा; पुण्यातल्या भिडेवाडा स्मारकासाठी 50 कोटींचा निधी!

राज्याचे हे पंचामृत बजेट सादर करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना चिमटे घेतले. तसेच यापूर्वीची काही उदाहरणे देत सभागृहातील वातावरण गंभीर होऊ दिले नाही.

दरम्यान, फडणवीस हे पंचामृत हा शब्द मात्र जरा जपून उच्चारताना पहायला मिळाले. एक-एक मुद्दा सादर केल्यानंतर ते म्हणत की, "आता मी दुसऱ्या 'पंचामृता'कडे वळतो." यातील 'पंचामृत' हा शब्द काहीतरी गडबड करेल याची त्यांना भीती वाटत होती. याचाही विरोधक वेगळा अर्थ काढतील, असा टोलाही त्यांनी यावेळी मारला. तसेच त्याचे कारणही फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Maharashtra Budget : महिलांसाठी खास सवलत; एसटीचा प्रवास आता अर्ध्या तिकिटात

पंचामृत बजेट सादर करणाताने फडवीस पाचव्या ध्येयापर्यंत पोहचले होते. त्यावेळी फडणवीस म्हणाले, "मी पाचव्या अमृताकडे वळतो. मला बजेटमधील पाचवे अमृत म्हणायचे आहे. विरोधक वेगळाच अर्थ काढतील. त्यांना वाटायचे की मी अमृताकडे वळतो, असे म्हणत आहे." त्यांच्या या मिश्किल टिपण्णीने सभागृहात एकच हशा पिकला. तसेच फडणवीस यांच्या विनोदबुद्धीला विरोधकांसह सर्व सभागृह सदस्यांनी बाके वाजवून दाद दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com