Mukta Tilak-Laxman Jagtap-Devendra Fadnavis
Mukta Tilak-Laxman Jagtap-Devendra FadnavisSarkarnama

लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळकांना फडणवीसांनी अर्पण केला राज्यसभा निवडणुकीतील विजय!

चंद्रकांतदादांना वाढदिवसाची भेट म्हणून कोल्हापूरचा पहिलवान दिला आहे.

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) आमचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तीनही उमेदवार विजयी झालेत. हा विजय आम्ही आमदार लक्ष्मण जगताप (Mla Laxman Jagtap) व मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना अर्पण करतो, अशा शब्दांत प्रकृती नाजूक असतानाही मतदानाचे कर्तव्य बजाविणारे या दोघांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सॅल्यूट केला. (Fadnavis Gave credits Laxman Jagtap, Mukta Tilak for winning Rajya Sabha elections)

राज्यसभा निवडणुकीचा रंगलेला ‘हाय व्होल्टेज ड्रामा’चा निकाल शनिवारी (ता. ११ जून) पहाटे साडेतीनच्या सुमारास लागला. या निवडणुकीत भाजपचे तीन, तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले. गेली काही दिवस जीवघेण्या आजाराचे सामना करणारे चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी पीपीई कीट घालून व्हिल चेअरवर जात मतदान केले होते. तसेच, आमदार मुक्ता टिळक यांनी तर स्ट्रेचर येत आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या दोघांनी पुण्यातून ॲम्बुलन्समधून येऊन मतदान केले होते, त्यांच्या या धैर्याचे फडणवीस यांनी निकालानंतर कौतुक केले.

Mukta Tilak-Laxman Jagtap-Devendra Fadnavis
आमदारांना घोडा म्हटलेलं आवडलं नाही ; फडणवीसांचा राऊतांना टोमणा

फडणवीस म्हणाले की, धनंजय महाडिक यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे जे मत बाद झाले आहे, ते ग्राह्य धरले असते तरीही आमचा विजय झाला असता. तसेच, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख असते तरी आमचा विजय झाला असता.

Mukta Tilak-Laxman Jagtap-Devendra Fadnavis
Rajya Sabha : कोणते आमदार फुटले ? परब, देसाईंवरचा विश्वास ठाकरेंना नडला

आमच्यासोबत नव्हते अशा आमदारांचेही आभार मानतो. जे स्वत:ला महाराष्ट्र, मुंबई समजतात, त्यांना आता समजले असेल की ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत, असा टोलाही फडणवीस यांनी शिवसेनेला नाव न घेता लगावला. आमची विजयाची मालिका अशीच सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

Mukta Tilak-Laxman Jagtap-Devendra Fadnavis
शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर चंद्रकांत पाटील म्हणतात, 'आमचे देवेंद्रजी आहेतच तसे'

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. योगायोगाने त्याच दिवशी निकाल होता आणि तोही भाजपच्या बाजूने लागला. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, चंद्रकांतदादांना वाढदिवसाची भेट म्हणून कोल्हापूरचा पहिलवान दिला आहे. तसेच, पियूष गोयल यांना केवळ राज्यसभेचे खासदार म्हणून नव्हे; तर राज्यसभेचे नेते म्हणून निवडून दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com