फडणवीसांनी मिस्टर इंडिया होऊन बाबरीचा ढाचा पाडला; शिवसेनेने पुन्हा डिवचले

Devendra Fadnavis| Raj Thackeray| Shivsena|अचानक हा ‘गोटा’ त्यांना प्रिय झाला व हिंदी भाषिक मंडळींना चुचकारण्याचे काम सुरू झाले. हे मतपरिवर्तन झाले त्यामागे नक्की कोणता व्यवहार आहे ते पाहावे लागेल
Devendra Fadnavis| Raj Thackeray|
Devendra Fadnavis| Raj Thackeray|

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जंगी सभा झाली. या सभेत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज यांनी खासदार शरद पवार यांच्यावर सडकून टीकाही केल्या. देवेंद्र फडणवीसांना बाबरी मशिदीचा उल्लेख करत शिवसेनेबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बाबरी मशिद पडली त्याला अनेक वर्षे लोटली आता भारतीय सीमेत घुसखोरी केलेल्या चिनी सैनिकांना बाहेर हाकला तर तुम्ही हिमीतीचे असे आव्हान देत फडणवीसांनी केलेल्या अनेक टीकांना आज दैनिक सामनातून शिवसेनेने (Shivsena) उत्तर दिले आहे. तर भाजपचे उपवस्त्र असा उल्लेख करत राज ठाकरे यांचादेखील समाचार घेतला आहे.

''फडणवीस म्हणतात, ‘बाबरी आम्हीच (म्हणजे त्यांनी) पाडली. तुम्ही भोंग्यांनाही घाबरता.’शिवसेनेने घाबरण्याचा किंवा न घाबरण्याचा प्रश्न येतोच कोठे? लोक श्रीरामाचे भजन करतात. भाजपवाले आता ऊठसूट बाबराचे भजन करू लागले आहेत. हा बदल बरा नाही. धमक्या व इशारे देण्यापेक्षा तुम्ही चीनला का व कसे घाबरताय त्यावर बोला. बाबरी आम्हीच पाडली असे सांगणाऱ्यांना देशात घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर ढकलता येत नाही. चीननेही गलवान व्हॅलीत 23 भोंगे लावले आहेत व ते देशाला आव्हान देत आहेत की, ‘‘आम्ही येथून बाहेर पडणार नाही!’’ मग ते भोंगेही उतरवा व चिन्यांनाही हाकला. तरच तुम्ही हिमतीचे!'' असा खोचक टोला शिवसेनेने लगावला आहे.

Devendra Fadnavis| Raj Thackeray|
भोंग्या' मागचा खरा 'ढोंग्या' नागपूरचा : सुनिल शेळके

फडणवीस म्हणतात, ‘बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसेना नेता अयोध्येत नव्हता. तो ढांचा पाडला तेव्हा तुम्ही कोठे होता? मी अभिमानाने सांगतो, होय, मी तो ढांचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो!’ आता फडणवीस म्हणतात, म्हणजे तेथे ते असणारच, पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचे नाव कोठेच दिसत नाही. शिवसेनेचे अनेक नेते व शिवसैनिकांची नावे बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. त्यामुळे फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.

तसेच, बाबरीचा ढांचा कोणी पाडला याबाबत अधिक माहिती महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांच्याकडून घ्यायला हवी. भंडारी आज हयात नाहीत, पण 6 डिसेंबरला दुपारी चार वाजताच भंडारी यांनी भाजपच्या वतीने स्पष्ट केले की, "बाबरी पाडण्यात भाजपचा हात नसून हे कार्य शिवसैनिकांनी केले असावे. भंडारी यांचे हे वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारे होते. फडणवीस हे त्या उसळलेल्या हिंदू जनसागरातून घुसून बाबरीच्या घुमटावर चढले व हातोडे मारीत राहिले याची नोंद इतिहासाला नसावी? हे आश्चर्यच आहे.'' अशी उपहासात्मक टीकाही शिवसेनेने केली आहे.

संभाजीनगरात भाजपच्या उपवस्त्राने सांगितले, ‘मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा, नाही तर आम्ही थांबणार नाही.’ उपवस्त्रांना आता उत्तर प्रदेशच्या प्रेमाचे जे अजीर्ण झाले आहे ते गमतीशीर आहे. आधी त्यांना उत्तर प्रदेश व तेथील लोक नजरेसमोर नको होते. हिंदी पट्टय़ातील लोक हिंदुस्थानात राहायलाच लायक नाहीत, असेच त्यांचे म्हणणे होते. योगी आदित्यनाथ यांना कळत नाही. डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेला एक माणूस भगवे कपडे घालून फिरतोय. हे किळसवाणे असल्याचे त्यांचे मत होते. आता अचानक हा ‘गोटा’ त्यांना प्रिय झाला व हिंदी भाषिक मंडळींना चुचकारण्याचे काम सुरू झाले. हे मतपरिवर्तन झाले त्यामागे नक्की कोणता व्यवहार आहे ते पाहावे लागेल, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com