फडणवीस आणि माझी दुश्मनी थोडीचंय, भेटीत राजकीय चर्चा नाही : चव्हाणांचा खुलासा

Ashok Chavhan : "काँग्रेसच्या महागाईविरोधातील आंदोलनात मी सहभागी होतोय”,असंही सूचकपणे अशोक चव्हाण म्हणाले.
Ashok chavan News, Congress Party Latest News, Nanded News
Ashok chavan News, Congress Party Latest News, Nanded NewsSarkarnama

मुंबई : सध्या गणेशोत्सवाची सगळीकडे धामधूम आहे. मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे .ऊत्सवांबरोबरच राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आले आहे. राजकीय गाठीभेटींचे सत्र सुरू आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे बलाढ्य नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. या भेटीनंतर चव्हाण हे आपल्या गटातले जवळपास १२ आमदार आणि समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. यावर आता सगळीकडे उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वत: अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट झाली पण आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही," असं अशोक चव्हाण म्हणाले.

Ashok chavan News, Congress Party Latest News, Nanded News
आता काही शो मॅन आता झालेत; Ajit Pawar यांचा निशाणा

"देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्या पक्षाचे नेते असले तरी, त्यांची आणि माझी दुश्मनी थोडीच आहे. आम्ही चांगले मित्र आहोत," असा खुलासा अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर केले आहे. अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची गुरुवारी (ता. १ सप्टेंबर) भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी भेट झाली आहे. या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीसंदर्भात फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली होती. अशोक चव्हाण आणि माझी कोणतीही भेट झाली नाही, असे स्पष्टीकरण देत फडणवीसांनी या भेटीचा दावा फेटाळून लावला होता.

Ashok chavan News, Congress Party Latest News, Nanded News
bjp-congress| फडणवीस-चव्हाण भेटीवर मुख्यमंत्री शिंदेंचे सूचक वक्तव्य

"देवेंद्र फडणवीसांसोबत माझी भेट झाली. पण या भेटीत राजकीय चर्चा नाही. आम्ही खासगी विषयांवर बोललो," असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. आपण काँग्रेसमध्येच असल्याचंही पुनुरूच्चार चव्हाण यांनी केला. आज काँग्रेसचं महागाईविरोधात दिल्लीत आंदोलन होणार आहे. त्यात ते सहभागी होणार आहेत. “काँग्रेसच्या महागाईविरोधातील आंदोलनात मी सहभागी होतोय”,असंही सूचकपणे, अशोक चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in