ठाकरेंनी केली कदम अन् अडसूळांची हकालपट्टी; शिंदेकडून उपनेते पद

शिवसेनेच्या (Shivsena) नेते पदाचा आनंदराव आडसूळ आणि रामदास कदम यांनी राजीनामा दिला होता
Uddhav Thackeray, Ramdas Kadam, Anandrao Adsul
Uddhav Thackeray, Ramdas Kadam, Anandrao Adsulsarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा दिली होता. (Ramdas Kadam Latest Marathi News)

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी नेतेपदाचा राजीनामा देताना पत्र लिहून शिवसेनेबद्दल नाराजीही बोलून दाखवली होती. कदम यांनी पत्रात म्हटले होते की 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर नेते पदाला कुठल्याही प्रकारची किंमत दिली नाही. हे मला पाहण्यास मिळाले, अशी टीका कदम यांनी केली आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचे काम आपल्याकडून कधीच झाले नाही. उलटपक्षी मला आणि माझ्या मुलगा आमदार योगेश कदम याला अपमानीत करण्यात आले, असा आरोप कदम यांनी केला आहे.

Uddhav Thackeray, Ramdas Kadam, Anandrao Adsul
मातोश्रीचा ‘तो’ निर्णय आढळरावांना २००४ प्रमाणे बंड करायला लावणारा!

विधानसभेच्या निवडणुकीआधी मला अचानक 'मातोश्री'वर बोलावून घेतले. मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले, तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. याचे कारण अजूनही मला कळू शकलेले नाही. मागील 3 वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्याचा मार मी सहन करत आहे, असेही कदम म्हणाले.

विधानसभा निवडणुकीनंतर 2019 मध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसबरोबर (Congress) सरकार बनवत होतात, त्याही वेळी आपल्याला हात जोडून विनंती केली होती, बाळासाहेबांनी आयुष्यभर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष केला आणि हिंदुत्त्व टिकवल आहे. काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी करू नका, असे बाळासाहेबांचे म्हणणे होते. तेच माझेही म्हणणे होते. मात्र, आपण माझे ऐकले नाही याचे दु:ख आहे. शिवसेनाप्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती, असे सांगत कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा ठाकरेंकडे दिला आहे.

Uddhav Thackeray, Ramdas Kadam, Anandrao Adsul
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; ठाकरेंना धक्का देत सेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी केली जाहीर

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला (ShivSena) एक-एक धक्का बसत आहे. खासदार, आमदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. त्यातच शिंदे यांनी शिवसेनेची नवी कार्यकारीनीही जाहीर केली आहे. शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com