मुंबई : माजी खासदार किरीट सोमय्या यांना आज मुंबई पोलिसांनी अटक केली. गटारात पडून शीतल दामा या महिलेचा गटारात पडून मृत्यू झाल्याप्रकरणी त्यांनी घाटकोपरमध्ये आज आंदोलन केले. यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन असून घाटकोपर पोलिस ठाण्यात नेले.
महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या करत होते. शीतल दामा यांचा 11 वर्षांचा मुलगा, त्यांचे पती व किरीट सोमय्या यांच्यासह शंभर जणांना पोलिसांनी अटक केली. शीतल दामांच्या मृत्यूला 13 दिवस झाले तरी गुन्हा का नोंदविला नाही, असा सवाल किरीट सोमय्या उपस्थित केला आहे.
शीतल दामाला न्याय मिळण्यासाठी FIR रजिस्टर करण्याचा आग्रह करणाऱ्या शीतल दामा यांचा 11 वर्षांचा मुलगा जय, पती जितेश व मला आणि इतरांना पोलिसांनी अटक केली. 100 निदर्शकांनी पोलिस आणि महापालिकेला प्रश्न विचारला, "शीतल दामाच्या मृत्यूला 13 दिवस झाले तरी FIR का नोंदविली गेली नाही?" pic.twitter.com/4BGmwrvigk
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 15, 2020
घाटकोपरमधील असल्फा गावात राहणाऱ्या शीतल या गिरणीवर पीठ आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. पण दोन तास होऊनही त्या घरी आल्याच नाहीत. त्यामुळे कुटुंबाने शोधाशोध सुरू केली. जवळच बंदिस्त नाला होता आणि त्यावरील काँक्रीटचे झाकण उचकटले होते. त्याच सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने शीतल नाल्यात पडल्या आणि मृत्यू झाला, असे सांगितले जात आहे. हाजीअलीजवळ त्यांचा मृतदेह आढळला असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. यात पालिकेचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

