सोमय्यांकडून महाविकास आघाडीतील माजी मंत्र्यावर 200 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप

किरीट सोमय्या ( Kirit Somayya ) यांनी महाविकास आघाडीतील एका माजी मंत्र्यावर 200 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला.
Kirit Somayya
Kirit Somayyasarkarnama

मुंबई - राज्यात सत्ता पालट झाल्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे शांत बसतील, असा कयास काही जणांनी लावला होता. मात्र किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी महाविकास आघाडीतील एका माजी मंत्र्यावर 200 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. समुद्रात स्टुडिओ बांधल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. ( Ex-minister of Mahavikas Aghadi accused of corruption of 200 crores by Somaiya )

किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत ज्या ज्या बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. राज्यात शिवसेनेचा एक गट भाजप बरोबर आला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेली. मात्र शिवसेनेचा एक गट अजूनही महाविकास आघाडी बरोबर आहे. त्यामुळे सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील माजी मंत्र्यांना लक्ष्य करणे थांबविलेले नाही.

Kirit Somayya
Video: अनिल परब यांची पून्हा एकदा ईडीला दांडी; किरीट सोमय्या

शिवसेनेचे खासदार संजय राऊत व माजी मंत्री अनिल परब यांच्यानंतर किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील आणखी एक माजी मंत्र्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील आणखी एका नेत्या विरोधात ईडी व सीबीआयची कारवाईचे शुक्लकाष्ट मागे लागणार हे निश्चित समजले जात आहे.

किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. अनेक मंत्र्यांवर टीका केली. त्यात काही मंत्र्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावूनही घेतले होते. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या विविध आरोप आणि दाव्यानंतर ईडीने संबंधित नेत्यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापा टाकले होते. राज्यातील दोन माजी मंत्री सध्या तुरुंगात आहेत. तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेते अडचणीत आले.

Kirit Somayya
Sanjay Raut : सोमय्या-राऊत 'सामना' पुन्हा रंगणार ; राऊतांना समन्स

तपास यंत्रणांच्या शुक्लकाष्टाला कंटाळूनच शिवसेनेचे आमदार बंडखोर झाले असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे. अशातच पुन्हा सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील माजी मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ईडीच्या नियमानुसार 100 कोटी अथवा त्यापेक्षाही जास्तचा भ्रष्टाचाराच्या आरोपांची तत्काळ चौकशी होते. त्यामुळे या माजी मंत्र्यावर ईडीची कारवाई होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in