
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना त्यांच्या गुड बुकमध्ये असलेले तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) पुन्हा अक्टिव्ह झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार गोव्यात असताना परदेशी हे हॉटेलमध्ये दिसले होते. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता ते थेट शिंदे यांच्या बैठकीत सह्याद्री अतिथिगृहात उपस्थित होते. (CM Eknath Shinde Latest News)
परदेशी यांनी राज्यात विविध विभागांमध्ये महत्वाच्या पदांवर काम केले आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आणले होते. त्यानंतर त्यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात 2020 त्यांची उचलबांगडी केली होती. त्यानंतर काही काळ त्यांच्याकडे नगर विकास खाते आणि जलसंधारण विभागाचा कार्यभार होता.
पण परदेशी हे संयुक्त राष्ट्राच्या एका प्रकल्पासाठी परदेशात गेले होते. यादरम्यान त्यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ते केंद्राच्या सेवेत रुजू झाले होते. या पदावर असताना ते नोव्हेंबर 2021 मध्ये निवृत्त झाले.
राज्यातील सत्तानाट्यादरम्यान काही दिवसांपूर्वी ते गोव्यात दिसले होते. बंडखोर थांबलेल्या हॉटेलमध्ये त्यांना पाहण्यात आले होते. त्यानंतर आता ते थेट मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. सह्याद्री अतिथीगृहात गुरूवारी झालेल्या बैठकीत परदेशी यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.