अबू आझमींची नाराजी नाही, आमचे सर्व उमेदवार निवडून येतील

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अबू आझमी नाराज नसल्याचा दावा केला.
Ashok Chavan & Abu Azmi
Ashok Chavan & Abu AzmiSarkarnama

मुंबई : समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) लिहिलेल्या पत्राबाबत काँग्रेस (Congress) नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत आमच्या सर्व जागा निर्विवादपणे निवडून येतील, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. (Samajwadi Party leader wrote a letter to Cm Uddhav Thakre)

Ashok Chavan & Abu Azmi
महाविकास आघाडीचा चेहरा तर नव हिंदुत्वाचा!

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जूनला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपला तिसरा उमेदवार मैदानात कायम ठेवल्याने घोडेबाजार तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार आझमी यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वेगळा राग आळवल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. आझमी यांनी भाजपला पुरक भूमिका तर गेतली नाही ना? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती.

Ashok Chavan & Abu Azmi
राज्यसभा म्हणजे काय? कशी होते राज्यसभेची निवडणूक?

यासंदर्भात काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मला वाटत नाही की, आझमी यांनी काही नाराजी व्यक्त केलेली आहे. मात्र त्यांनी आपल्या रास्त अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. त्यांच्या अपेक्षांबद्दल काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी अतिशय गांभिर्याने काम करीत आहे.

त्यांनी मांडलेल्या विषयांत, मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो, अल्पसंख्यांत मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो, हे सर्वच विषय आमचे प्राधान्याचे विषय आहेत. त्यांचा आम्ही पाठपुरावा करीत आहोत. आपण पाहिले की, ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाने वेगळी भूमिका घेतल्यानंतर आरक्षण थांबले. मराठा आरक्षण देखील पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेमुळे त्यात बसवा असा एक निर्णय झाला. मुस्लीम समाजाचे आरक्षण सतत काही ना काही कारणामुळे अडून राहिलेले आहे. मात्र या सर्व आरक्षणांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे. या समाज घठकांना आरक्षण मिळाले पाहिजे. त्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय व्हावेत हीच महाविकास आघाडीची भूमिका आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in