Shiv Sena : शिवसेना, धनुष्यबाण शिंदेंकडे जाणार? माजी निवडणूक आयुक्तांनी थेटच सांगितलं...

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे धाव घेण्यात आली आहे.
Ex Chief Election Commissioner S Y Qureshi, Shev Sena Latest News News
Ex Chief Election Commissioner S Y Qureshi, Shev Sena Latest News News Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह चाळीस आमदार आणि बारा खासदारांच्या बंडानंतर शिवसेना (Shiv Sena) कुणाची, धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह कुणाला मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिंदे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा गट शिवसेना आपलीच असल्याचा दावा करत आहेत. शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तसा दावाही केला आहे. माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी (S. Y. Qureshi) यांनी याअनुषंगाने काही दाखले देत पक्ष आणि चिन्ह कुणाकडे जाणार, याबाबत सूचक संकेत दिले आहेत. (Shiv Sena Latest Marathi News)

कुरेशी यांनी शिवसेनेत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत निवडणूक आयोग काय निर्णय घेऊ शकते, त्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत, याकडं लक्ष वेधलं. 'मुंबई तक'शी बोलताना त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये पहिल्यांदा 1969 मध्ये झालेल्या बंडाचे उदाहरण दिले.

Ex Chief Election Commissioner S Y Qureshi, Shev Sena Latest News News
Mamata Banerjee : ममतांच्या वर्चस्वाला पहिला धक्का; अत्यंत विश्वासू मंत्री गजाआड

कुरेशी म्हणाले, 'आयोगासाठी हा नवा मुद्दा नाही. 1968 मध्ये आयोगाने सिम्बॉल ऑर्डर तयार केल्यानंतर लगेचच काही दिवसांत 1969 मध्ये काँग्रेसमधील वाद समोर आले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. त्यावेळी आयोगाने बहुमताच्या आधारे आमदार व खासदारांची संख्या विचारात घेऊन निर्णय घेतला होता. न्यायालयानेही आयोगाचा निकाल ग्राह्य धरला होता. त्यानंतर बहुतेकवेळा आयोगाने त्याचआधारे निर्णय घेतला आहे.'

कुरेशी यांनी दिलेल्या या माहितीमुळे सध्यातरी शिंदे गटाचे पारडे जड दिसत आहे. त्यांच्याकडे आमदार आणि खासदारांचीही संख्या जास्त आहे. पण संघटनात्मक पातळीवरील बहुमतही आयोग विचारात घेत असल्याचेही कुरेशी यांनी स्पष्ट केलं. 'सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते की, हा संपत्तीचा मुद्दा नाही. हा एक पक्ष असून तो दोन तुकड्यांमध्ये वाटता येणार नाही. पूर्ण पक्ष एकाकडेच राहू शकतो, त्याचा निर्णय बहुमतावर होऊ शकतो.'

Ex Chief Election Commissioner S Y Qureshi, Shev Sena Latest News News
बाबो...! मंत्र्याच्या सहकाऱ्याच्या घरात वीस कोटींच घबाड: पैशाचा अक्षरश: ढिगाराच

'सर्वाधिक आमदार, खासदार कुणाकडे आहेत आणि संघटनात्मक पातळीवरील काय स्थिती आहे, त्यातील बहुमत कुणाकडे आहे, हेही आयोग पाहतो. चार-पाच वर्षांपूर्वी समाजवादी पक्षात मुलगा आणि वडिलांमध्ये वाद झाला होता. मुलाने आपल्याकडेच बहुमत असल्याचे सिध्द केले होते. त्यानंतर आयोगाने अखिलेश यादव यांच्याकडे पक्ष राहील, असा निर्णय दिला होता. तशीच स्थिती शिवसेनेबाबतही दिसत आहे. पण संघटनात्मक पातळीवरील स्थितीकडे आयोग कशाप्रकारे पाहतोय, हे सांगू शकत नाही, असंही कुरेशी यांनी सांगितले. त्यामुळेच आता शिंदे आणि ठाकरे गटाकडून संघटनात्मक पातळीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पावले टाकली जात असल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com