घटना दुर्दैवी, ही विकृती ठेचायलाच हवी; पण विरोधकांनी राजकारण करू नये..

साकीनाकासारख्या दुर्देवी घटना घडू नये म्हणून सरकारला अधिक कठोर पावले उचलावी लागतील.
 घटना दुर्दैवी, ही विकृती ठेचायलाच हवी; पण विरोधकांनी राजकारण करू नये..
Shivsena Leader Sanjay Raut Reaction News Mumbai

मुंबई : साकीनाकामधील घटना दुर्देवी आहे, पीडितेला वाचविण्याचे प्रयत्न झाले; पण यश आले नाही. ही विकृती आहे, विरोधी पक्षाने भुमिका मांडलीच पाहिजे पण या घटनेचे राजकरण करणे म्हणजे दुर्देवी मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे आहे. (The events in Sakinaka are unfortunate, distorted; But the opposition should not do politics.) ही विकृती ठेचायलाच हवी, अशी संतप्त भावना शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.

साकिनाका येथे आमनुष अत्याचार झालेल्या महिलेचा राजावडी रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत बोलताना ते म्हणाले, 'महाराष्ट्राच्या राजधानीत महिलांना नेहमीच सुरक्षित वाटत आले आहे. (Shivsena Leader Sanjay Raut Mumbai) जगभरातील शहरांमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत मुंबईचे स्थान वरच्या क्रमांकावर आहे.

हा कायदा सुवस्थेबरोबरच महिला सुरक्षेचाही प्रश्‍न आहे. सरकार, पोलिसांचा धाक असला तरी ही विकृती आहे. काही वेळा ही विकृती उफाळून येते. गुन्हेगार फासावर जातील, असेही राऊत यांनी नमुद केले.

अशा घटना राज्याला खाली मान घालवणाऱ्या असतात. त्या महिलेला वाचविण्याचे प्रयत्न झाले, तिची जबानी घेता आली असती तर पोलिसांना अधिक माहिती मिळाली असती. पोलिसांनी सीसी टीव्हीच्या मदतीने मुख्य आरोपीला पकडले आहेत. त्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षाही व्हावी.

तसेच, या विकृतीवर उपाय काय, याबाबतही विचार करायला हवा. साकीनाकासारख्या दुर्देवी घटना घडू नये म्हणून सरकारला अधिक कठोर पावले उचलावी लागतील. ही घटना घडत असताना पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला स्थानिकांकडून फोन आला, तेव्हा पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलली.

गुन्हेगारांमध्ये राज्य सरकार आणि पोलिसांचा धाक आहेच, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी सकाळी राजावाडी रुग्णालयात जाऊन या महिलेच्या प्रकृतीचा आढावा घेतला होता. तेव्हा पीडितेसोबत तिची आई होती. पीडिता व आरोपी १०-१२ वर्षांपासून परिचित असल्याचे तिच्या आईने सांगितल्याचे महापौरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.