Jitendra Awhad : 'त्या' ऑडिओ क्लिपचा रिपोर्ट सत्तेत बसलेले मॅनेज करतील; आव्हाडांचा गंभीर आरोप

Jitendra Awhad News : ''दोन-दोन महिन्यांनी आमच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करता, कशासाठी?''
Jitendra Awhad News
Jitendra Awhad News Sarkarnama

Thane News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आव्हाडांच्या समर्थकांकडून ठाणे मनपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करण्यात आली.

त्यानंतर जितेंद्र आव्हाडांसह सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता. आता या सर्व प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. तसेच यावेळी त्यांची मुलगी नताशा आव्हाड या देखील त्यांच्याबरोबर उपस्थित होत्या.

आव्हाड म्हणाले, ''महेश आहेर (Mahesh Aahir) यांच्या कॅबिनमध्ये पैशाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एवढे पैसे कुठून आले? यांना कुणाची साथ आहे. मुळात महेश आहेर यांचे एवढे शिक्षण नसतानाही एवढ्या मोठ्या पदावर बसवण्यात आलं आहे. पण सध्या राजकारणाची पातळी फार मोठ्या प्रमाणात ढासळली आहे'', असं ते म्हणाले.

Jitendra Awhad News
Jitendra Awhad : आव्हाडांनी शेअर केली "एका बाबाची गोष्ट.." ; पिता म्हणून हे सगळं सहन करायचं ?

''मला खात्री आहे की आता त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा महेश आहिरचा नाही, हे सिद्ध करून घेतलं जाईल. आहिरचा तो आवाजच नाहीये असे रिपोर्ट समोर येतील. कारण सत्तेत कोण आहे? हे आम्हाला माहित आहे.

घडलेल्या प्रकारबाबत आपण पोलिसांना काही सांगू शकत नाहीत. कारण पोलिसांना सांगून काही होत नाही. आपण सत्तेतही नाही'', असं म्हणत त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली.

Jitendra Awhad News
Bhagat Singh Koshyari : इतिहासात शुन्य मार्क, तर तुकडी ढ..; जाता जाताही कोश्यारींना राष्ट्रवादीने डिवचले

''307 कलम आमच्यावर कसं लावता. मी मारहाणीचे समर्थन करत नाही. पण साधं खरचटलेलंही नाही. तरी देखील 307 कलम लावता? सगळ्या अॅंगलचे व्हिडिओ आमच्याकडे आणि तुमच्याकडे आहेत. ते तपासा त्यामधून तुम्हालाही समजेल.

पण खोटं काहीही सांगून आमच्यावर गुन्हे दाखल करता. दोन-दोन महिन्यांनी आमच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करायचे हे कशासाठी? यावरूनच राजकारणाची पातळी फार मोठ्या प्रमाणात ढासळलीय हे दिसत आहे'', असं आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad News
Congress Leader rejected KCR offer : ‘अण्णा, माफ करा. तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही’ : सोलापूरच्या नेत्याने नाकारली ‘KCR’ची ऑफर

दरम्यान, आव्हाडांच्या कन्या नताशा यावेळी म्हणाल्या की, ''ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर आम्ही तक्रार दाखल केली. पण त्यावर अद्याप काहीही झाले नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुरक्षा पुरविण्याची घोषणा केली होती.

मात्र, अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क केला नाही. उलट आमच्याविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या. पण आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही कुठं जायचं?'', असा सवाल नताशा आव्हाड यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com