Raosaheb Danve On INDIA : सर्व विरोधक एकवटले तरी नरेंद्र मोदींचा पराभव अशक्य ; दानवेंनी 'इंडिया'ला डिवचलं !

Raosaheb Danve About PM Narendra Modi : आजवर खूप गरीबी हटावच्या घोषणा...
Raosaheb Danve On India
Raosaheb Danve On IndiaSarkarnama

Dhule News : विरोधकांनी आजवर गरीबी हटावच्या घोषणा केल्या, मात्र खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनाच्या योजना थेट गरीबांच्या घरात पोहोचवल्या, सामान्य माणसांनापर्यंत विकासाची गंगा नेली, अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहचत आहेत, त्यामुळे सगळे विरोधक एकत्र आले तरी ते मोदी यांचा पराभव करू शकणार नाहीत, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले. (Latest Marathi News)

Raosaheb Danve On India
Congress Vs BJP : राजुऱ्यात राजकीय धामधूम; काँग्रेस-भाजप आमनेसामने, वातावरण तापलं

दानवे म्हणाले, "नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावर सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानले. सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. मोदी हे सक्षम पंतप्रधान आहेत. देशातील सर्व विरोधक एकत्र आले तरी ते मोदींचा पराभव करू शकत नाहीत."

Raosaheb Danve On India
Ambadas Danve On Fadnavis: मंत्रीमंडळ बैठकीआधीच दानवेंकडून फडणवीसांनी मुख्यमंत्री असतांना केलेल्या घोषणांचा पंचनामा..

आगामी निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षच सत्तेवर येईल, असा दावाही दानवे यांनी केला. दानवे यांच्या उपस्थितीत धुळे येथे पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, सभागृह नेते अनिल वानखेडे, नगराध्यक्षा रजनी वानखेडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कामराज निकम, बाजार समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख आदी उपस्थित होते.

Raosaheb Danve On India
NCP Crisis News : अजित पवारांची बैठकीला दांडी; शरद पवार यांच्यापुढे येणे जाणीवपूर्वक टाळले ?

दानवे यांनी यावेळी काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, "काँग्रेस काळात नेत्यांनी फक्त कुटुंबाचा विकास कसा होईल, याकडेच लक्ष दिले. या उलट मोदी सरकारने देशातील जनतेला केंद्रबिंदू मानून विविध क्षेत्रांत विकासाची कामे हाती घेतली. महाराष्ट्राच्या वाटेला रेल्वेसाठी १२ हजार कोटी रुपये केंद्राने दिले. आगामी काळात देश अधिक सक्षम होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनतेने खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Edited By - Chetan Zadpe

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in