Eknath Shinde यांच्या बंडाला 48 तास पूर्ण : तरीही फडणवीस पत्ते खुले करेनात...

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडागामे देवेंद्र फडणवीस असल्याची चर्चा
Eknath Shinde यांच्या बंडाला 48 तास पूर्ण : तरीही फडणवीस पत्ते खुले करेनात...
Eknath Shinde, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आठ्ठेचाळीस तास झाले आहेत. शिंदे यांनी शिवसेनेच्या ३४ आमदारांसह आधी सुरत आणि त्यानंतर आसामधील गुवाहटी गाठले आहे. शिंदे यांच्या बंडामागे भाजपची (BJP) आणि त्यातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची फूस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तरीही एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप काय आणि कशी भूमिका घेणार, याविषयी फडणवीस यांनी भाष्य केलेले नाही. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

Eknath Shinde, Devendra Fadnavis
सत्तांतर नाट्य Live : ठाकरे हे शिंदेंना शिंगावर घेणार : अविश्वास ठरावाला सामोरे जाणार

विधान परिषद निवडणूक निकालानंतर 20 जूनच्या रात्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या रात्रीच शिंदे यांच्या बंडास सुरवात झाली. जनतेच्या मनातील सरकार पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी विधान परिषदेच्या निकालानंतर केले होते. तसेच या निवडणुकीत कोण फुटले, याची सारी माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही तुमचे स्पेक्युलेशन चालू ठेवा, असा उपरोधिक टोला माध्यमांना लगावला होता. या साऱ्या भाष्याला आता 48 तास पूर्ण झाले आहेत. तरीही भाजपचे उघडपणे शिंदे यांना पाठिंबा दिलेला नाही. ठाकरे सरकार राहणार की जाणार याविषयी कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

भाजपकडून किंवा आपल्याकडून कोणतीही अगळीक या वेळी होणार नाही, याची काळजी फडणवीस घेत आहे. त्यांच्या पत्नी अमृता यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचणारे ट्वीट केले होते. हे ट्विट देखील नंतर डिलिट करण्यात आले. यावरूनच बाष्कळ बडबड करून शिवसेनेला दुखवायचे नाही आणि आपले पत्ते खुले करायचे नाहीत, असा इरादा फडणविसांचा असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde : ठरलं! समर्थकांसोबत चर्चा करून एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेणार

असे असले तरी शिंदे यांनी फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतरच हा सारा खटाटोप केल्याचे उघड सत्य आहे. सुरतमध्ये शिंदे यांची सर्व व्यवस्था गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली असल्याचे सांगितले जात होते. सुरत येथे शिवसेनेची मंडळी ही बंडखोरांना भेटायला येत असल्याचे दिसताच सेना बंडखोरांची गुवाहटी येथे रवानगी करण्यात आली. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वसर्मा हे या बंडखोरांना तेथे भेटले. यावरूनच भाजप नेत्यांनीच या व्यवस्थेत पुढाकार घेतल्याचे लपून राहिले नाही.

शिंदे हे आमदारांना घेऊन गुजरातला गेले तेव्हा फडणवीस दिल्लीमध्ये होते. तेथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते मंगळवारी मुंबईत दाखल झाले.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
"असं होणार हे मी तर आधीच सांगितलं होतं" : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

फडणवीस मुंबईत दाखल झाल्यानंतर भाजपचे नेते आणि आमदार फडणवीस यांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देत आहेत. दिवसभरामध्ये केंद्रीय मंत्री राबसाहेब दानवे, आमदार गिरीष महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते भेटून गेले आहेत. फडणवीस बोलले नसले तरी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. ''की शिंदेंचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. त्याचबरोबर सरकार स्थापनेसंदर्भात जर शिंदे यांनी प्रस्थाव दिला तर आम्ही विचार करु, असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे सरकार स्थापन केले होते. मात्र, ते सरकार यशस्वी होऊ शकले नाही. त्यामुळे फडणवीस सावध भूमिका घेऊन पडद्यामागून हालचाली करत असल्याची चर्चा आहे. शिंदे समर्थक आमदारांची संख्या व ते परत शिवसेनेत जाणार नाहीत, याची पूर्ण खात्री झाल्यानंतरच सरकार स्थापन करायचे, असा उद्देश या साऱ्यांतून दिसून येत आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
सत्तांतर नाट्य Live : उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला शिंदेंचा ठेंगा : निर्णय घेणारच!

तसेच लोकांमध्ये ठाकरे सरकार भाजपने पाडले असा मेसेज जायला नको, याची पूर्ण खबरदारी पक्षाच्या वतीने घेतली जात आहे. शिंदे यांच्या सोबत भाजपचे काही नेते आहेत. कार्यकर्ते फडणवीसांना शुभेच्छा देत आहेत. मात्र, ते अत्यंत साधवपणे पावले टाकत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in