Aslam Shaikh Studio Scam : राऊतांनंतर अस्लम शेख ED च्या रडारवर ; सोमय्यांचे सूचक टि्वट

मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे," असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
Aslam Shaikh
Aslam Shaikhsarkarnama

मुंबई : मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी पर्यावरण मंत्रालयाने काँग्रेस नेते अस्लम शेख (aslam sheikh) यांना नोटीस पाठवली आहे.पर्यावरण विभागाने मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी टि्वट करुन माहिती दिली आहे.

पर्यावरण मंत्रालयाकडून नुकतेच मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला नोटीस जारी करून मढ आईसलँडमधील चित्रपट स्टूडिओंच्या अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी आता महाविकास आघाडी सरकारमधील माजी वस्त्रोद्योग, मस्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री काँग्रेसचे आमदार अस्लम शेख हे ईडीच्या रडारवर आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 1000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले असून हे स्टूडिओ पाडण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Aslam Shaikh
Thackeray Government : मंत्रीपद गेलं तरीही १४ मंत्र्यांचा मुक्काम सरकारी बंगल्यातच!

"अस्लम शेख – मढ मार्वे ₹1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळा. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितलं. मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे," असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Aslam Shaikh
Shinde Government : मंत्रालयात फायलींचे ढिग साठले ; संभाव्य मंत्र्यांच्या क्षमतेबाबतही शंका

टि्वटमध्ये किरीट सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर केलेले आरोप

  • अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे. असे पाच स्टुडिओ आहेत. ज्यात CRZ नियमांच उल्लघन केले आहे.

  • गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मी पाहणी केली. कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे.

  • आदित्य ठाकरे यांनी पण येथे भेट दिली होती. ज्या जागेवर 2019 साली काही नव्हते तिथे 2021 ला स्टुडिओ उभारला आहे.

  • अस्लम शेख आणि भाटिया स्टुडिओ यांचे मालक भागीदार असल्याचे सांगितले जाते आहे.

  • या जागेवर पर्यावरण विभागाने सहा महिन्यासाठी फिल्म सेट उभारणी साठी परवनगी दिली होती.

  • अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ उभारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in