आधी मालमत्तांवर टाच अन् आता 'ईडी'चं मलिकांविरोधात पाच हजार पानांचं आरोपपत्र

काही दिवसांपूर्वीच ईडीने मलिकांच्या आठ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे.
आधी मालमत्तांवर टाच अन् आता 'ईडी'चं मलिकांविरोधात पाच हजार पानांचं आरोपपत्र
Nawab Malik News updates, Nawab Malik Money Laundering CaseSarkarnama

मुंबई : सक्त वसुली संचालनालयाने (ED) गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नबाव मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात विशेष न्यायालयात पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं. मलिक यांना ईडीने मनी लाँर्डिंग प्रकरणात अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपपत्रामध्ये 9 खंड आणि 52 परिशिष्ट आहेत. काही दिवसांपूर्वीच ईडीने मलिकांच्या आठ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. (Nawab Malik News Updates)

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) कथित संबंध आणि मनी लॉंण्ड्रिंग प्रकरणात इडीने २३ फेब्रुवारी नवाब मलिक यांना रोजी ईडीने अटक केली आहे. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी मलिक यांनी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे 'टेरर फंडिंग` असल्याचा आरोपही ईडीने केला आहे. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यांची मागणी लावून धरली होती. तर महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली होती.

Nawab Malik News updates, Nawab Malik Money Laundering Case
गणेश नाईकांना दिलासा नाहीच; न्यायालयानं दिला दणका

ईडीने अटक केल्याच्या विरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण 22 वर्षांपूर्वीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. उच्च न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली होती. यामुळे मलिक यांनी आता जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या मलिक यांना 22 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ईडीनं मलिकांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाईही केली आहे. या कारवाईमुळे मलिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकाचवेळी त्यांच्या आठ मालमत्ता जप्त करून ईडीने मोठी कारवाई केली आहे. मलिकांच्या आठ मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. त्यामध्ये उस्मानाबादेतील 148 एकर जमिनीसह मुंबईतील कुर्ल्यातील तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिम येथील दोन फ्लॅट, कुर्ला पश्चिम येथील व्यावसायिक जागा आणि गोवावाल कंपाऊंडमधील मालमत्तेचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.