Mid-term elections : 'जानेवारीत निवडणुका लागणार': राज ठाकरेंकडून मध्यावधीचे संकेत..

Raj Thackeray | गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेही बरेच अॅक्टिव्ह झालेले दिसत आहेत.
Raj Thackeray
Raj Thackeray sarkarnama

Raj Thackeray मुंबई :  उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या कार्यकर्त्यांना, राज्यात मध्यावधी निवडणुका (Mid-Term Elections) लागतील, तयारी लागा, अशा सुचना दिल्या होत्या. त्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील राज्यात जानेवारी महिन्यात निवडणुका लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुदपुर्व निवडणुका लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे संकेत दिले आहेत. निवडणुकीत बोंबलायचंय म्हणून घशाला आराम देतोय, असं सुचक विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. मी घशाला आराम देतोय, जानेवारीपासून बोंबल बोंबल बोबलायचंच आहे, घसा आपला असतो, तर गळा लता मंगेशकर अशा मोठ्या लोकांचा असतो. म्हणून आता घशाला आराम देतोय, असंही त्यांनी म्हटलं आहे. पण या निवडणुका विधानसभेच्या असतील की, महापालिकेच्या, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीत.

Raj Thackeray
Jitendra Awhad resign : आव्हाडांवर विनयभंगाच्या गुन्हा दाखल ; राष्ट्रवादीकडून जाळपोळ

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेही बरेच अॅक्टिव्ह झालेले दिसत आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यापासून लहान मोठ्या कार्यक्रमांनाही ते लावताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या हालचाली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर नाही ना असाही प्रश्न अनेकांना पडला आहे

दरम्यान, महाराष्ट्रातील मध्यावधी निवडणुकीची तयारी दिल्लीतूनच सुरू झाली असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. '' महाराष्ट्राचं राजकारण खूपच अस्थिर झाल्याने दिल्लीतूनच मध्यावधीची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं भाकीत राऊतांनी केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. तेव्हापासून राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांना दुजोरा देणारं विधान संजय राऊत यांनीदेखील केलं होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीदेखील निवडणुकांचे संकेत दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com