राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर...

Election : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Cooperative Societies Elections, Latest News
Cooperative Societies Elections, Latest NewsSarkarnama

जळगाव : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहिर झाल्या आहेत. तसेच सहकारी संस्थाच्याही निवडणुका आहेत. दोन्हीचे कार्यक्षेत्र ग्रामीण भाग असल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे राज्यातील न्यायालयीन आदेशानुसार निवडणुका (Election) होत असलेल्या सहकारी संस्था वगळून ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थाच्या निवडणुका आहे. त्या टप्प्यावर स्थगित करून २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतर आहे त्या टप्प्यावर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Cooperative Societies Elections, Latest News)

Cooperative Societies Elections, Latest News
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ठाकरेंची फिल्डिंग; भाजप आमदाराच्या भावालाच दिली मोठी जबाबदारी

राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागातर्फे राज्याचे विशेष कार्यकारी अधिकारी, सहनिबंधक सहकारी संस्था यांनी आज हे आदेश जारी केले आहेत. या आदेशात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामंपचायतीचा निवडणूक कार्यक्रम १८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत जाहीर करण्यात आला आहे. तसेच राज्यातील ७ हजार १४७ सहकारी संस्थाचा निवडणूक कार्यक्रम देखील सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ‘अ’ वर्ग ३८, ‘ब’वर्ग ११७०, ‘क’ वर्ग ३१५१ व ‘ड’वर्गातील २७८८ संस्था आहेत.

सहकारी संस्था निवडणुका पुढे

ग्रामपंचायत व सहकारी संस्था निवडणूका एकाच वेळी आहेत, दोन्हीचे क्षेत्र ग्रामीण आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.तसेच दोन्ही क्षेत्रातील बरेचशे मतदार हे ग्रामीण भागातील असल्याने ते मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दोन्ही निवडणुकीत मतदारांना सहभाग नोंदविता यावा यासाठी शासनाच्या अधिकारात राज्यातील ‘अ‘ व ‘ब’ वर्गातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहे.

Cooperative Societies Elections, Latest News
Tukaram Munde : डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे पाहणार शिर्डी साई संस्थानचा कारभार

२० डिसेंबरनंतर प्रक्रिया

अध्यादेश जारी झालेल्या तारखेपासून आहे, त्या टप्यावर निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहे. २० डिसेबर २०२२ नंतर आहे, त्या टप्प्यापासून ही निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू करण्यात येईल. जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणूकीची प्रक्रिया चिन्हापर्यंत आलेली आहे. उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली आहेत.यापुढे मतदानाची प्रक्रिया. २० डिसेंबरनंतर पुढे ही प्रक्रिया सुर करण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com