निवडणूक गुजरातमध्ये, मात्र सुट्टी मिळणार महाराष्ट्रातील 'या'चार जिल्ह्यात...

Gujrat Election : या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल...
Gujrat Election, Latest News
Gujrat Election, Latest NewsSarkarnama

पिंपरी : गुजरात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुढील महिन्यात १ व ५ तारखेला दोन टप्यांत मतदान होत आहे. विधानसभा वा लोकसभा निवडणूक होणाऱ्या राज्यांत मतदानाच्या दिवशी मतदान करण्याकरिता सुट्टी जाहीर केली जाते. मात्र, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात ती देण्यात येणार आहे,असे सांगितले,तर आश्चर्य वाटेल ना? पण,ते खर आहे. (Gujrat Election, Latest News)

Gujrat Election, Latest News
मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर विखेंचे अतिक्रमण; बदलीचा आदेश काढला महसूल विभागाने...

गुजरात विधानसभा निवडणुकीत मतदार असलेल्या पालघर, नाशिक, नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यातील मतदारांना ही भरपगारी सुट्टी मिळणार आहे. सुट्टी शक्य नसेल,अशा खासगी कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरिता दोन तासांची सवलत देण्यास सांगण्यात आले आहे.तसा आदेश राज्याच्या उद्योग,कामगार व ऊर्जा विभागाने नुकताच काढला आहे.

Gujrat Election, Latest News
Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले, ओबीसी जनता या देशाचा कणा आहे...

त्यानुसार गुजरात (Gujrat) राज्यात मतदार असलेल्या म्हणजे तेथे राहणाऱ्या पण,वरील चार जिल्ह्यांत काम करणाऱ्या चाकरमान्यांना ही सुट्टी वा सवलत मतदानासाठी दिली जाणार आहे.तसे तेथील जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग,राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह गुजरात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल,असा इशारा सबंधितांना देण्यात आला आहे.

दरम्यान, काही आस्थापना त्यातही खासगी कंपन्या या आपल्या अधिकारी, कर्मचारी मतदारांना भरपगारी सुट्टी वा सवलत मतदान करण्यासाठी देत नसल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागते.परिणामी मतदानाचा टक्का घसरतो.लोकशाहीसाठी ही बाब घातक असल्याने राज्याच्या उद्योग विभागाचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार यांनी यासंदर्भातील आपल्या आदेशात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com