नितीन राऊतांचे डबल कनेक्शन : मुलाकडे काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

युवक काँग्रेस (congress) प्रदेशाध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती.
 Kunal Raut
Kunal Rautsarkarnama

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या (Congress) प्रदेश अध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वाधिक ५ लाखांहून अधिक मते घेणाऱ्या कुणाल राऊत (Kunal Raut) यांची आज (ता. १६) प्रदेशाध्यक्षपदी निवड घोषित करण्यात आली. अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी जारी केलेल्या पत्राद्वारे राऊत यांची नियुक्ती जाहीर केली.

कुणाल राऊत यांची नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवून व मिठाई वाटप करून आनंद साजरा केला. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये, कुणाल राऊत यांनी ५ लाखांहून अधिक मते घेऊन बाजी मारली. कुणाल राऊत यांना 5 लाख 48 हजार 267 मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवराज मोरे यांना ३ लाख 80 हजार 367 तर शरण बसवराज पाटील यांना 2 लाख 46 हजार 695 मते मिळाली होती.

 Kunal Raut
'काश्मीर फाईल्स' वर अजितदादांची रोखठोक भूमिका : भाजपचा दबाव धुडकावला

युवक काँग्रेसच्या युवा मतदारांनी व राज्यातील युवा शक्तीनी माझ्यावर जो विश्वास दाखविला तो मी सार्थ करून दाखवेल, अशा शब्दात कुणाल राऊत म्हणाले. निवडणुकीत मदत करणारे युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार शब्दांत मानणे कठीण आहे, असेही ते म्हणाले. युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याबद्दल मी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांचे आभार मानतो," अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

 Kunal Raut
रजनी पाटील यांनी उपराष्ट्रपतींचं मन जिंकलं अन् सभागृह दणाणलं!

कोण आहेत कुणाल राऊत?

कुणाल राऊत हे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांचे पूत्र आहेत. "संकल्प" या स्वयंसेवी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला. एनएसयुआयचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस झाले होते. तसेच 2018 च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com