मुंबईतून चित्रा वाघ तर कोल्हापूरातून शौमिका महाडिकांचे नाव आघाडीवर!

धुळे-नंदुरबार मधून पुन्हा अमरीश पटेल यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Chitra Wagh, Shaumika Mahadik
Chitra Wagh, Shaumika Mahadiksarkarnama

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना भाजप आणखी एक मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी चित्रा वाघ यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चिात झाल्याचे समजते.

मंगळवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीनंतर होणाऱ्या कोअर कमिटी बैठकीत अंतिम शिकामोर्तब होणार आहे. त्याच बरोबर धुळे-नंदुरबार मधून पुन्हा अमरीश पटेल यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कोल्हापूरमधून शौमिका महाडिक आणि राहुल आवाडे ही दोन नावे चर्चेत असून, यातील एका नावावर शिक्कामोर्तब होईल. यामध्ये शौमिका महाडिक यांचे नाव आघाडीवर आहे, असल्याचे सांगितले जात आहे. शौमिका महाडिक या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या आहेत.

Chitra Wagh, Shaumika Mahadik
भाजपमध्ये इनकमिंग; आता माथाडी नेत्याचा प्रवेश

नागपूरमधून कोनाला उमेदवारी द्यायची या बाबत अद्याप चर्चा सुरु आहे. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान आणि 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मुंबई महानगरपालिके मधून विधान परिषदेवर दोन आमदार निवडून जातात. यासाठी होणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकांच्या संख्याबळानुसार शिवसेनेचा एक आणि भाजपचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. या जागेसाठी भाजपककडून वाघ यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा होऊन प्रदेश सुकाणू समितीकडून उमेदवाराची शिफारस केंद्रीय समितीकडे पुढील आठवड्यात केली जाणार आहे.

Chitra Wagh, Shaumika Mahadik
सत्तेसाठी पटोले तलवार म्यान करतात ; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात चित्रा वाघ यांनी जोरदार मोहिम उघडली आहे. विशेषत महिलांच्या प्रश्नावरुन त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधातील प्रकरण चित्रा वाघ यांनी चांगलेच लावून धरले होते. शेवटी राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. राज्यातील बड्या नेत्यांना डावलून चित्रा वाघ यांना नुकतेच राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. याच बरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शौमिका महाडिक याचे नाव आघाडीवर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com