निवडणुकांच्या तारखा सोशल मीडियावर व्हायरल; इच्छुकांची धावपळ

Local Body Election: Vasai-Virar: 15 एप्रिल पासून आचार संहिता लागू होणार, असे या व्हायरल निवडणूक कार्यक्रमात सांगण्यात आले आहे.
Local Body Elections
Local Body Electionssarkarnama

विरार : वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक (Vasai-Virar Municipal Election) गेल्या दोन वर्षा पासून रखडली असून ती मे मध्ये होण्याची श्यक्यता असतानाच ओबीसींच्या (OBC Reservation 2022) मुद्यावरून राजकारण रंगल्याने आणि ओबीसी शिवाय निवडणुका न घेण्याचे सर्वच पक्षांनी जाहीर केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा येथील निवडणूक लांबणीवर गेली आहे. एका बाजूला हे चित्र असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र, निवडणूक आयोग (Election Commission) किंवा राज्य शासनाने (State Government) जाहीर न केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमाने मात्र चांगलीच रंगत आणली आहे. जाहीर न झालेल्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम समाज माध्यमावर (social media) फिरत असल्याने इच्छुकांची चागंलीच धावपळ पाहायला मिळत आहे.

Local Body Elections
नाना कदम जिंकणार; फडणवीसांनी सांगितली कोल्हापूरची 'पोलिटिकल केमिस्ट्री'

वसई विरार महापालिकेची निवडणूक गेल्या दोन वर्षा पासून रखडली आहे. त्यातच कोरोना कमी झाल्याने निवडणूक लवकरच लागेल या आशेवर असलेल्या इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुद्धा केली असतानाच परत एकदा ओबीसींच्या मुद्यावरून निवडणूक पुढे गेल्याने. अनेकांचा हिरमोड झाला असतानाच समाज माध्यमावर निवडणुकीच्या तारखेसह निवडणुकीचा कार्यक्रम व्हायरल झाल्याने इच्छुकांची धावपळ सुरु झाली. व्हायरल होत असलेल्या निवडणुकीच्या या कार्यक्रमात 15 एप्रिल पासून आचार संहिता लागू होणार 29 एप्रिलला वार्ड रचना आणि त्यावरील सोडत. 1 ते 6 मे दरम्यान आक्षेप दाखल करणे, 10 ते 17 मे दरम्यान नामांकन दाखल करणे 20 मे ला नामांकन अर्ज छाननी, 25 मे नामांकन मागे घेणे. 5 जून ला मतदान आणि १० जूनला निकाल, असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Local Body Elections
प्रदेशाध्यक्षांवर मोठी नामुष्की; पोटच्या मुलानेच धरला विरोधी पक्षाचा हात

दरम्यान, याबाबत निवडणूक आयोगाकडे चौकशी केली असता, असा कोणताही कार्यक्रम जाहीर करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकूणच रखडलेल्या निवडणुकीमुळे इच्छुक मात्र कासावीस झाल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. एप्रिल महिना हा एप्रिल फुलचा असल्याने कोणीतरी समाज माध्यमावर निवडणुकी बाबत एप्रिल फुल केल्याचेही बोलले जात आहे. मात्र, हा मेसेज व्हायरल झाल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com