प्रभाग बदलाच्या पालिका आयुक्तांच्या अध्यादेशाविरोधात जनहित याचिका दाखल

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नव्या प्रभाग अध्यादेश विरोधात भाजपच्या नितेश राजहंस सिंह आणि मनसेच्या सागर कांतीलाल देवरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Ward Structure
Ward Structuresarkarnama

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना (Ward Structure) जाहीर झाली, हरकती नोंदवण्यासाठी १४ फेब्रवारीपर्यंत मुदत आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) १ फेब्रुवारी रोजी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नव्या प्रभाग अध्यादेश विरोधात भाजपच्या नितेश राजहंस सिंह आणि मनसेच्या सागर कांतीलाल देवरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

२३६ प्रभाग सीमांकन आणि त्यात बदल करण्याचा पालिका आयुक्तांच्या अध्यादेशाविरोधात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पालिका आयुक्तांना असे अध्यादेश काढण्यास सांगितले नसतानाही ही अधिसूचना पालिका आयुक्तांनी काढल्याचे याचिककर्त्यांचं म्हणणं आहे. राज्य निवडणूक आयोगाने २००५ मध्ये दिलेल्या आदेशानुसार , स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकाळ संपण्याआधी सहा महिन्यांच्या आत क्षेत्र आणि सीमांमध्ये कोणताही बदल करू शकत नाहीत.

२९ डिसेंबर २०२१ला निवडणूक आयोगाने निर्भय, मुक्त आणि पारदर्शक निवडणूक घेण्याचे आदेश काढले होते. पन पालिका आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेत २९ डिसेंबरच्या आदेशाचा संदर्भ नाही आणि त्यामुळे ही अधिसूचना मनमानी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेत नागरिकांकडून पहिल्या 7 दिवसांत फक्त ४० हरकती आणि सूचना आलेल्या आहेत. हरकती नोंदवण्यासाठी १४ फेब्रवारीपर्यंत मुदत आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) १ फेब्रुवारी रोजी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला. यावेळी तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने २०१७ च्या तुलनेत ही प्रभाग रचना (Ward Structure) पूर्णपणे वेगळी आहे. काही प्रभाग दोन, तीन चार, भागात विभागले आहेत. सोसायट्या, वस्त्यांचीही विभागणी झाली आहे. प्रभाग रचनेबाबत नगरसेवकांमध्येदेखील नाराजी असून, हक्काचा मतदार दुसऱ्या प्रभागात केल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

Ward Structure
भाजपनं कधीही न जिंकलेल्या जागांसाठी पाशा पटेल मैदानात

पुणे महापालिकेच्या (PMC) निवडणूक शाखेकडे १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान, ४० हरकती आणि सूचना आलेल्या आहेत. निवडणूक शाखेने जाहीर केलेल्या अधिसूचना आणि नकाशा एक सारखे नाही. जो भाग नकाशात आहे, तो अधिसूचनेत नाही आणि जो अधिसूचनेत नाही तो नकाशात आहे असे प्रकार घडल्याने नागरिक आणि स्थानिक पुढारीही संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेचा अभ्यास अद्यापही सुरू असून, उर्वरित दिवसात हरकती आणि सूचना येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com