शिंदे गटानं झिरवळांवरच डाव उलटवला; महेश बालदी अन् विनोद अग्रवालांनी दिली साथ

शिवसेनेकडून 17 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिंदे गटानं झिरवळांवरच डाव उलटवला; महेश बालदी अन् विनोद अग्रवालांनी दिली साथ
MLA Vinod Agrawal News, Assembly Deputy Speaker Narhari Zirwal Latest News, Mahesh Baldi NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेने बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 17 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. त्यामुळे शिंदे गट अडचणीत आल्याची चर्चा होती. पण आता अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल हे शिंदे गटासाठी धावून आले आहेत. झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव यापूर्वीच दाखल केला असल्याने त्यांना आमदारांना अपात्र करता येणार नाही, असं पत्र दिलं आहे. (Deputy Speaker Narhari Zirwal Latest News)

भारतीय राज्यघटनेतील कलम 179 आणि महाराष्ट्र विधानसभा नियम 11 नुसार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना हटवण्याची नोटीस आधीच दिली आहे. शिवसेनेतील (Shiv Sena) काही आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे, असं म्हणून बालदी व अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने अशा घटनांबाबत नोंदविलेले निरीक्षणे पत्रात नमूद केली आहेत.

MLA Vinod Agrawal News, Assembly Deputy Speaker Narhari Zirwal Latest News, Mahesh Baldi News
वरिष्ठांच्या आदेशानुसारच गुवाहाटीत! गीता जैन यांचे वरिष्ठ कोण? चर्चांना आलं उधाण

विधानसभा अध्यक्षांवरच अविश्वास प्रस्ताव दाखल असताना ते इतर सदस्यांना अपात्र ठरवू शकत नाहीत, असं बालदी व अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम 7(3)(b) नुसार सदस्यांना आपली बाजू मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत द्यावी लागते. त्यामुळे त्यांना ही मुदत द्यायला हवी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

MLA Vinod Agrawal News, Assembly Deputy Speaker Narhari Zirwal Latest News, Mahesh Baldi News
ठाकरे आता थेट भिडले; आधी बारा अन् आता आणखी पाच आमदारांवर अपात्रतेचे संकट

यापार्श्वभूमीवर झिरवळ यांनी सदस्यांना अपात्र ठरवले तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरेल. त्यामुळे उपाध्यक्षांनी सदस्यांना अपात्र ठरवण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, असं बालदी आणि अग्रवाल यांनी पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे आता झिरवळ हेच कात्रीत सापडले आहेत. झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सध्याच्या सत्तानाट्यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in