शिंदेंचा ठाकरेंना इशारा; मी मुलाखत देईल तेव्हा भूकंप होईल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना इशारा दिला
CM Eknath Shinde| Uddhav Thackeray|
CM Eknath Shinde| Uddhav Thackeray| sarkarnama

मुंबई : आम्ही चुकलो असतो, तर लोकांनी आम्हाला समर्थन दिले नसते. गाडीतून जाताना तोंड फिरवले असते, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला. त्याच बरोबर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही त्यांनी इशारा दिला मी मुलाखत दिली तर भूकंप होईल, असे ते म्हणाले.

शिंदे आज मालेगावात बोलत होते. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सत्कार समारंभ आणि इतर कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. यावेळी शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची शिवसेना पुढे न्यायची आहे. तर आनंद दिघे यांच्याबाबत राजकारण झाले आहे. त्याचा खुलासा लवकरच करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीदेखील आम्हाला पाठिंबा दिला. तुम्ही लढवय्ये आहात, बाळासाहेबांचे नाव तुम्ही उज्ज्वल कराल, असे नरेंद्र मोदी आपल्याला म्हणाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

CM Eknath Shinde| Uddhav Thackeray|
सत्तार-दानवेंच्या जाळ्यात खोतकर अडकले, त्यांना बाहेर काढणे अवघड ; घोसाळकरांनी हात टेकले..

पंतप्रधानांनी माझे संपूर्ण भाषण ऐकले. मनापासून आपण भाषण केले, असे मोदी म्हणाले, असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आषाढी एकादशीची पूजा करण्यासाठी मी पंढरपूरला गेलो होतो. भाग्य लागते त्यासाठी, असे सांगत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

CM Eknath Shinde| Uddhav Thackeray|
ज्यांनी इंग्रजांची सत्ता उलथवली; तेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना धडा शिकवतील... शरद पवार

मी स्वत: ला भाग्यवान समजतो. विविध कार्यक्रमांना मी हजर होतो. ज्या ठिकाणी मी गेलो, तेथे रस्त्याच्या दुतर्फा हजारो माणसे होती. हात उंचावून त्यांनी माझे स्वागत केल्याचेही शिंदे यांनी सांगितले. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास त्यांनी दिला, असा दावा शिंदे यांनी केला. तर आम्ही कोणालाही पळवले नाही. आम्ही कोणाचाही विरोध करत नाही, हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com