संतोष बांगरांच्या शक्तिप्रदर्शनातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

Eknath Shinde| Santosh Bangar| शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि संतोष बांगर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
Eknath Shinde| Santosh Bangar|
Eknath Shinde| Santosh Bangar|

मुंबई : हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी आज (१२ जुलै) सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि संतोष बांगर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संतोष बांगर यांची हिंगोली शिवसेना जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर संतोष बांगर यांनी आज थेट मुंबईत येऊन हे शक्तिप्रदर्शन केलं.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगर यांना हिंगोलीच्या जिल्हाध्यक्षपदाचे कामकाज सुरु ठेवण्याचे आदेश दिले. हे शक्तिप्रदर्शन नाही तर प्रेमाचं दर्शन आहे. संतोष बांगर हे कडवट आणि कार्यतत्पर शिवसैनिक आहे. हिंगोलीचे लोकप्रिय आमदारही आहेत. शिवसैनिकांने अन्यायाला वाचा फोडावी असं बाळासाहेबांनी सांगितलं होत. हे बंड नाही तर उठाव आहे, असंही त्यांनी म्हटंल.

Eknath Shinde| Santosh Bangar|
प्रल्हाद जोशी यांनीच रचलं येडियुरप्पांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचे षडयंत्र!

गेल्या महिन्याभरातल्या घडामोडी तुम्ही पाहिल्या, आमचा प्रवास पाहिला, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सर्व आमदारांनी वेगळी भूमिका घेतली. तेच विचार संतोष बांगर यांनाही पटले आणि ते आमच्या सोबत आले. ही केवळ राज्यात आणि देशातसाठीही ऐतिहासिक घटना आहे. हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. राज्यात शिवसेना भाजपचं हे जे सरकार स्थापन झालं आहे. ते लोकांच्या मनातलं, सर्वसामान्यांच, कष्टकऱ्याचं, सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या विचाराने काम करेल, अशी ग्वाही यावेळी एकनाथ शिंदेनी दिली.

"गेल्या अडीच वर्षात शिवसेना संपवण्याचं काम होत होतं.पण आता एकनाथ शिंदे एकटे मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सर्वजणही मुख्यमंत्री आहात, आता तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे. आता एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कुणी करणार नाही. संतोष बांगर यांच्या जिल्ह्यातील एकही काम शिल्लक ठेवणार नाही,असही एकनाथ शिंदेंनी सांगितलं. हे सरकार राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील राहिल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in