बंड एकनाथ शिंदेंचे पण वसई विरारमध्ये फायदा बविआ'ला होणार

Eknath Shinde latest news| वसई विरारमध्ये सत्तारूढ बहुजन विकास आघाडीच्या विरोधात एकनाथ शिंदे ह्यांनी आघाडी उघडली होती.
बंड एकनाथ शिंदेंचे पण वसई विरारमध्ये फायदा  बविआ'ला होणार
Eknath Shinde latest news|

विरार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांना बरोबर घेऊन शिवसेनेत (Shivsena) बंड पुकारले असून, त्यामुळे महाविकास आघाडी अडचणीत आली आहे. एका बाजूला असे असले तर दुसऱ्या बाजूला मात्र वसई विरार मध्ये शिवसेना आणि बविआमध्ये सत्तेसाठी जबरदस्त चढाओढ सुरु असून या सगळ्याचे मागे एकनाथ शिंदे हे ठामपणे सेनेचा किल्ला लढवत होते.

आता जर एकनाथ शिंदे सेनेतून गेले तर त्या ताकदीचा एकही नेता याठिकाणी सेनेचा किल्ला लढवण्यासाठी नसल्याचे बोलले जात आहे. किंबहुना शिंदेनी असा नेताच तयार होऊन दिला नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महानगरपालिका ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख नेमला जातो परंतु एकनाथ शिंदे यांनी मात्र वसई विरार महापालिकेच्या स्थापनेनंतर ११ वर्षानंतर हि याठिकाणी जिल्हा प्रमुख न देता आपली पकड ठेवल्याने याठिकाणी सेनेत हि त्यांच्या बद्दल नाराजी आहे. तर बविआच्या काही लोकांना सेनेत आणून त्यांना विविध पदाचे आमिष दाखविले होते.परंतु सेनेत प्रवेश करून या नेत्यांना वर्ष झाले तरी त्यांना कोणतेही पद देण्यात आले नाही.

Eknath Shinde latest news|
Eknath Shinde Live Update : उद्धव ठाकरे हे नार्वेकरांच्या फोनवरून शिंदेंशी बोलणार?

वसई विरारमध्ये सत्तारूढ बहुजन विकास आघाडीच्या विरोधात एकनाथ शिंदे ह्यांनी आघाडी उघडली होती. त्यांनी थेट आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावरही आरोप केले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे विरुद्ध हितेंद्र ठाकूर हा राजकीय लढा या ठिकाणी चांगलाच गाजत होता. वसई विरार महापालिकेची निवडणूक रखडल्यावर शासनाने या ठिकाणी प्रशासक आणून बसवल्यावर नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून प्रशासकाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी बविआची कोंडी करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केल्याचे दिसून आले होते. एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाल्यास ते भाजपमध्ये दाखल होतील

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आणि हितेंद्र ठाकूर यांचे सलोख्याचे संबंध बघता एकनाथ शिंदे यांनी वसई विरारमध्ये ते किती हस्तक्षेप करू देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ज्या पद्धतीने वसई विरारमध्ये शिवसेना वाढली आहे. त्या पद्धतीने भाजप मात्र याठिकाणी वाढलेला दिसत नसल्याने येणाऱ्या काळात सेनेतून ठाकूर यांच्या विरोधात सेना कोणाला उतरविणार यावर येथील राजकीय गणिते ठरणार आहेत. तूर्तास तरी एकनाथ शिंदेच्या बंडाचा फायदा मात्र एक विरोधक कमी झाल्याने बविआला होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in