एकनाथ शिंदेंचं 'नातू प्रेम'; मुख्यमंत्री आजोबा तब्बल चार तास थांबले रुग्णालयात...

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंच्या 'नातू प्रेमाची' चर्चा होत आहे.
CM Eknath Shinde & grandson Rudransh Shinde  Latest News
CM Eknath Shinde & grandson Rudransh Shinde Latest News Sarkarnama

Eknath shinde : गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांनी शिवसेनेसोबत बंड करत सुमारे 40 आमदारांना सोबत घेतले आणि भाजपच्या समर्थनाने राज्यात सत्तांतर घडवलं आणि नवं सरकार स्थापन केल आहे.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांनीच शपथ घेतली आहे. त्यामुळे या दोघांवरच राज्याचा कारभार सुरू आहे. यामुळे दोघांची मोठी धावपळ होत आहे. मात्र, या धावपळीतही मुख्यमंत्री शिंदेंनी आपला नातू आजारी असल्याने तब्बल चार तास वेळ दिला आहे. यामुळे शिंदे यांंच्या 'नातू प्रेमा'ची चर्चा होत आहे. (CM Eknath Shinde & grandson Rudransh Shinde Latest News)

CM Eknath Shinde & grandson Rudransh Shinde  Latest News
पवारांच्या भाकिताला शहाजीबापूंचा थेट इतिहासातील संदर्भ; म्हणाले...

मुख्यमंत्री शिंदेंचा नातू रूद्रांशची (Rudransh Shinde) तब्येत आज (ता.17 जुलै) बिघडल्याने त्याला आज बेलापूर येथील अपोलो रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यामुळे आपल्या लाडक्या नातवाच्या तब्येतीची विचारपूस आणि काळजी म्हणून ते तब्बल चार तास रूग्णालयात थांबले होते. शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुलगा रुद्रांश याला आज ताप आला होता. त्यामुळे त्याला बेलापूरातील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आजोबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत तिथेच असल्याची माहिती मिळत आहे.

CM Eknath Shinde & grandson Rudransh Shinde  Latest News
Video : नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो फेकले कचऱ्यात

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जे सत्तानाट्य रंगत आहे. त्यामुळे शिंदेंची प्रचंड दगदग होतांना दिसत आहे. यामध्ये मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने देवेंद्र फडणवीस आणि त्यांना दोघांनाच राज्याचा कारभार चालवावा लागत आहे. यामुळे मोठी धावपळ होत आहे. त्यात शिवसेनेसोबत बंडखोरी केल्याने त्यांच्याकडूनही नव्या सरकारवर रोज टीका केली जात आहे. त्यात आपल्या सोबत आलेल्या आमदारांना सांभाळत सर्वांना वेळ द्यावा लागत आहे. इतक सर्व असूनही शिंदेंनी आज आपल्या नातवासाठी काढलेल्या वेळामुळे त्यांच्या नातू प्रेमाची चर्चा झाली.

नातवाची भेट घेतल्यावर शिंदे हे नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दाखल झाले होते. तिथे त्यांची केंद्रीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक बैठक होणार असल्याची माहिती मिळत होती.

CM Eknath Shinde & grandson Rudransh Shinde  Latest News
एकदा नाही तर लाख वेळा गद्दार म्हणेन, बांगरांमध्ये हिंमत असेल तर...

दरम्यान शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळात भाषण करत असताना जोरदार बॅटिंग केली होती. सत्ता गेली अन् जर सोबत आलेल्या आमदारांमधील एक जरी आमदार पराभूत झाला तर मी शेती करायला गावी जाईल किंवा मला एक छोटा नातू असून फुल टाईमपास आहे. हीच माझी संपत्ती असल्यास त्यांनी म्हटलं होतं. यावरून शिंदेंचं नातवावर किती प्रेम आहे हे बघायला मिळालं होतं. तसेच, शिंदे शपथविधीच्या इतक्या गडबडीत सुद्धा आपल्या नातवाला आपल्या कडेवर घेतलेले बघायला मिळाले होते, आता ते मुख्यमंत्री झाले असल्याने संपूर्ण राज्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र, तरीही त्यातून वेळ काढत आजोबाचं कर्तव्य ते विसरले नसल्याचे बघायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in