शिवसेना केंद्रीय मंत्र्यांना पुरुन उरली; कपिल पाटलांच्या शहापुरात शिंदे वरचढ

Nagar Panchayat Election Results : शहापूर नगरपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

शहापूर : भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या घरच्या मैदानावरील शहापूर नगपंचायतीमध्ये शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. शहापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे पुन्हा एकदा सत्ता आली आहे. १७ पैकी १० जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे, तर ७ जागांवर भाजपाला यश आले आहे. शिवसेनेचा हा विजय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकास कामांमुळेच झाला असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले

शहापूर नगरपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी एकूण ४६ उमेदवार रिंगणात उतरले होते. या ठिकाणी मुख्य लढत ही शिवसेना आणि भाजप यांच्यात पाहायला मिळाली. एकूण २ टप्प्यात पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर झाला. निकालात शिवसेनेने १७ जागांपैकी १० जागांवर विजय मिळवत शहापुरचा गड पुन्हा राखला. तर कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (Ncp) एकही उमेदवार निवडून येवू शकला नाही.

Eknath Shinde
मंत्री विश्वजित कदम यांना जबर धक्का; कडेगावमध्ये भाजपची सत्ता

यापुर्वी शहापूर नगरपंचायतीत शिवसेना १०, राष्ट्रवादी ३, भाजप ३, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल होते. यापैकी भाजपचे २ नगरसेवक आणि १ अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला होता. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळाली. निवडणुकीत शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Eknath Shinde
निफाडला अनिल कदमच बॅास; राष्ट्रवादीच्या आमदार दिलीप बनकरांना धक्का

दरम्यान जरी शहापुरमध्ये शिवसेनेने गड राखला असला तरी आजच्या निकालानंतर राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपला एकूण १६४९ जागांपैकी भाजपला ३८४, राष्ट्रवादीला ३४४, काँग्रेसला ३१६ तर शिवनेला २८४ जागा मिळाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com