Chandrakant Khaire on Maharashtra Politics: एकनाथ शिंदे जादूटोणा..; सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर खैरेंचा गंभीर आरोप...

Supreme Court Hearing Day: गेल्या वर्षी जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड केले.
Chandrakant Khaire on Maharashtra Politics:
Chandrakant Khaire on Maharashtra Politics:Sarkarnama

Chandrakant Khaire Statement :  राज्याच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Poltical Crisis) सुनावणीचा निकाल सर्वोच्च न्यायालयात आज जाहीर होत आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. (Eknath Shinde witchcraft..; In the background of the power struggle, Khairen's serious accusation)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जादूटोणा करतात. आताही ते आता तीन दिवस जादूटोणा करायला गेले होते. हे छु छा करणारे व्यक्ती आहे, हे मला माहीत आहे, असा धक्कादायक आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. मी न्यायालयाला काही मागू शकत नाही. पण मी देवाकडे मागू शकतो. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने लागावा, अशी देवाकडे मागणी केली आहे. या निकालासाठी आम्ही खूप आशादायी आहोत. असंही त्यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political Crisis)

Chandrakant Khaire on Maharashtra Politics:
Supreme Court Final Decision : आज फैसला : ठाकरे गट-शिंदे गटाची धाकधुक वाढली..; आत्तापर्यंत काय घडलं, सविस्तर वाचा

गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी नेत्यांच्या संशयास्पद हालचाली वाढल्या होत्या तेव्हापासूनच आमच्या लक्षात आलं होतं की काहीतरी गडबड चालू आहे. राज्याच्या सत्तासंघर्षावर आज निकाल जाहीर करणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केलं. राजकीय तज्ञ मंडळींकडूनही हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार असल्याचे सांगितलं जात आहेत. सत्तार, सामंत काय म्हणतात याकडे मी लक्ष देत नाही. ते म्हणत असतील की एकनाथ शिंदे कट्टर धार्मिक आहेत. पण एकनाथ शिंदे देवपुजा वगैरे काही करत नाही. ते छु छा करतात, रात्री अपरात्री दोन वाजता कुठेतरी जातात. ते जादूटोणा करतात, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसे ठाकरे गट आणि शिंदे गटाची धाकधुक वाढली आहे. गेल्या वर्षी जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड केले. बंडखोर आमदारांविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपसभापतींकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, उपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगितीची मागणी केली होती. (Maharashtra Politics)

Chandrakant Khaire on Maharashtra Politics:
Narhari Zirwal News : माझ्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजुर झालेला नाही!

सुप्रीम कोर्टात सुमारे 9 महिने चाललेल्या प्रदीर्घ सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला होता. शिवसेनेच्या सोळा बंडखोर आमदारांच्या निलंबनावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल येणार आहे.

Edited By- Anuradha Dhwade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com