म्हणून... एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार

CM Eknath Shinde Guwahati Tour | मुंबईतून पलायन केल्यानंतर एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदार एक आठवडा गुवाहाटीतही मुक्कामाला होते.
CM Eknath Shinde Guwahati Tou
CM Eknath Shinde Guwahati Tou

CM Eknath Shinde Guwahati Tour मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात ठाण्यात छटपुजेनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिंदेंनी गुवाहाटीला जाणार असल्याची माहीती दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा शिंदे आपल्या सर्व समर्थक आमदारांसह गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्या दरम्यान कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर हे सर्व आमदार अयोध्या दौऱ्यावरही जाणार आहेत.

मुंबईतून पलायन केल्यानंतर तीन आठवड्यांच्या या काळात एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदार एक आठवडा गुवाहाटीतही मुक्कामाला होते. इथे कामाख्या देवीच्या दर्शनाला जाताना सर्वांनी मोठे शक्तीप्रदर्शनही केले. त्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या उलथापालथी झाल्या. महाराष्ट्रात सत्तांतर झाले.

CM Eknath Shinde Guwahati Tou
पुणे पालिकेत मनसे-भाजपची युती होणार?; राज ठाकरेंचे शिलेदार खासदार बापटांच्या भेटीला...

तीन-चार महिन्यांनंतर आता पुन्हा मुख्यमंत्री शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह पुन्हा एकदा गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात सत्तांतराच्या काळात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांना भेटणार आहेत. तसेच, कामाख्या देवीच्या मंदिरात विशेष पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. "कामाख्या देवीचे आशिर्वाद आमच्या सोबत असून, देवीच्या आशिर्वादामुळे काय झाल हे सर्वांनी बघितले आहे", त्यामुळे आपण देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती या पुर्वीच दिली होती. त्यानुसार पुढील आठवड्यात गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार असल्याची शिंदेच्या गोटातून समोर आली आहे.

या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच पोलीस कमिशनर यांना भेटणार आहेत. शिंदे यांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी बाजीराव चव्हाण, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि इतर पदाधिकारी गुवाहाटीत दाखल झाले आहेत. 

तसेच, मुख्यमंत्री शिंदे हे अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. मात्र अयोध्या दौरा आधी होईल की गुवाहाटी, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पण या दोन्ही धार्मिकस्थळी जाऊन ते सहकाऱ्यांसोबत दर्शन घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com