Video व्हायरल करुन अजित पवारांचा प्लॅन एकनाथ शिंदेंनी उधळून टाकला

Eknath Shinde | Ajit Pawar | : भाजपसोबत जाण्याचा शिंदेंचा निर्णय
Video व्हायरल करुन अजित पवारांचा प्लॅन एकनाथ शिंदेंनी उधळून टाकला
Eknath Shinde News, Ajit Pawar Latest News Sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामागे अजून भाजपचा रोल दिसत नाही. सध्याच्या परिस्थिती कोणताही भाजपचा मोठा नेता तिथे दिसून येत नाही, असे म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला सत्ता संघर्षाच्या नाट्यातून क्लिनचीट देवून टाकली. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मिडीयामध्ये यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा या वक्तव्यामागे काही डाव आहे का असा सवाल विचारला जावू लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपसोबत संबंध खराब होवू नये म्हणून असे म्हणतं आहेत का? असा सवाल विचारण्यात येत आहे.

मात्र अजित पवार यांचे हे विधान व्हायरल होताच शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडीओ व्हायरल करत अजित पवार यांचा हा दावा खोडून काढला. या व्हिडीओत एकनाथ शिंदे यांची सर्व आमदारांनी मिळून गटनेता पदी निवड केले असल्याचे दिसत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांचे आभार मानून त्यांच्याशी संवाद साधला. यामुळे शिंदे यांच्याकडे आता सूत्रे आली आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी ते घेतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगितले. सर्व आमदारांनी हात वर करून त्यास अनुमोदन दिले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

याच व्हिडीओमध्ये आमदारांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा उल्लेख करत तो पक्ष आपल्याला काहीही कमी पडू देणार नाही असे सांगितले असल्याचे बोलत आहेत. त्यांनी या पक्षाचे नाव घेतले नसले तरीही हा पक्ष म्हणजे भाजप आहे हे स्पष्ट होते. आपण कोणासोबत जायचे याबाबत त्यांनी थेट भाजपचे नाव घेतले नाही. तरी देशातील एक राष्ट्रीय पक्ष आहे. तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे, तो ऐतिहासिक आहे, असे या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने सांगितले. जे काय सुख, दुःख आहे, ते आपल्या सर्वांचे आहे. ती नॅशनल पार्टी आपल्याला कमी पडू देणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. त्यावर तानाजी सावंत यांनी साहेब, तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू असे म्हंटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in