अन् एकनाथ शिंदेंनी धरले धर्मवीर आनंद दिघेंचे पाय; सभागृह गदगदले...

Eknath Shinde | Anand Dighe | Thane | Movie : धर्मवीर आनंद दिघेंना पाहून एकनाथ शिंदेंना भावना अनावर...
अन् एकनाथ शिंदेंनी धरले धर्मवीर आनंद दिघेंचे पाय; सभागृह गदगदले...
Eknath Shinde | Anand Dighe Sarkarnama

मुंबई : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) म्हणजे ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले नेते. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आनंद दिघे यांच्याच मार्गदर्शनात राजकारणात आले. पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यामुळे ते आजही दिघे यांना गुरुस्थानी मानतात. दरम्यान आज ठाण्यात आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर आधारित 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाचा (Anand Dighe Movie 'Dharmaveer') म्यूझिक लॉंच सोहळा पार पडला. यावेळी प्रसाद ओक यांच्या रुपातील आनंद दिघे यांना पाहून एकनाथ शिंदे यांनी थेट त्यांचे पाय धरले. (Anand Dighe Movie News)

प्रविण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेला 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट येत्या १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. यापूर्वी १४ एप्रिलला या चित्रपटाचा टिझर लॉंच करण्यात आला आहे. तर आज चित्रपटाचा म्यूझिक लॉंच सोहळा ठाण्यात पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. या चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितीज दाते यांनी साकारली आहे.

Eknath Shinde | Anand Dighe
राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; शिवसैनिकांच्या आक्रमकतेनं मातोश्रीबाहेरचं वातावरण तापलं

दरम्यान चित्रपटाची घोषणा झाल्यानंतरच आनंद दिघे यांची भूमिका कोण साकरणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र आजच्या सोहळ्यावेळी आनंद दिघे यांच्या भूमिकेतील प्रसाद ओक यांना पाहून एकनाथ शिंदेंना भावना अनावर झाल्या आणि त्यांनी थेट व्यासपीठावर सर्वांसमोर प्रसाद ओक यांचे पाय धरले. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या नात्यातील जिव्हाळा सांगणारा हा प्रसंग पाहून तिथे उपस्थित शिवसैनिक आणि इतर प्रेक्षकांचे डोळे पाणावले. हा क्षण सर्वांनीच जवळून अनुभवला. पाया पडल्यानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि फोटो सेशनला सुरुवात झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.