शिंदे गटाला पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिकांची रीघ; नंदनवन बंगल्यावरील गर्दी हटेना

Uddhav Thackeray | Eknath Shinde : ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदे तगडं आव्हान देण्याच्या तयारीत...
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्हा शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र एकनाथ शिंदे यांच्याबंडानंतर शिवसेना ठाकरे-शिंदे गटात विभागली असून ठाण्यात शिंदे गटाला मिळणार पाठिंबा वाढत आहे. अशातच ठाण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील आणि उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह बदलापूर, अंबरनाथ पालिकेतील, शहापूर, मुरबाड या नगरपंचायतींमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. (Eknath Shinde | Shivsena Latest News)

जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, अंबरनाथ पंचायत समितीच्या सभापती अनिता निरगुडा, अंबरनाथ तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी यांच्यासह बदलापूरचे शहरप्रमुख वामन म्हात्रे, बदलापूर, अंबरनाथ नगरपालिकेतील आणि शहापूर, मुरबाड या नगर पंचायतींमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नंदनवन बंगल्यावर जावून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून गटात सहभागी झाले.

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी या सर्व प्रवेशांसाठी पुढाकार घेतला होता. कुळगाव बदलापूर नगर पालिकेत शिवसेनेचे २४ नगरसेवक निवडून आले होते आणि तीन स्वीकृत नगरसेवक होते. या सर्वांनी आज शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूरातील वामन म्हात्रे गट हा नेमका उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे की एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. शुभेच्छा बॅनरवर देखील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो वापरण्यात आले होते.

कालच वसई - विरार महानगरपालिकेतील ५, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवक, वसई तालुका आणि बाईसर विभागातील प्रमुख पदाधिकारी निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, बोईसर शहरप्रमुख मुकेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य कुंदन संख्ये या सर्वांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा वाढत असून ४० आमदारांपाठोपाठ अनेक माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार, नाशिक अशा महापालिकांमधील नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांवर नाराज असलेल्यांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in