ठाकरेंची कारवाई शिंदेंनी धुडकावली ; नरेश म्हस्केंची ठाणे जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती

मनमानी पद्धतीने हकालपट्टी केलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा त्याच पदांवर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला आहे.
naresh mhaske
naresh mhaskesarkarnama

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (shiv sena) बंड केल्यानंतर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (naresh mhaske) यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून नरेश म्हस्के यांची हक्कालपट्टी केल्याचं जाहीर केलं होते. मात्र,ही हकालपट्टी आता बेकायदेशीर ठरवून धुडकावण्यात आली आहे. (naresh mhaske latest news)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख या पदावर पुनर्नियुक्ती केली आहे. नरेश म्हस्के यांनी काल (गुरूवारी) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी जिल्हाप्रमुख पदाची सुत्रं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा म्हस्के यांच्याकडे सोपवली. पदाधिकाऱ्यांची नेमणुक करण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखांना असतो. मस्के यांच्या या नियुक्तीनंतर शिवसेनापत्रप्रमुख काय भूमिका घेतात, हे लवकरच समजेल.

naresh mhaske
फडणवीसांकडून शिंदेंना अपमानास्पद वागणूक ? सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्र्यांची काळजी

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे यांच्या समर्थनार्थ म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. मनमानी पद्धतीने हकालपट्टी केलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा त्याच पदांवर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला आहे.

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गिय आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा ध्वज हाती घेणाऱ्या कट्टर शिवसैनिकांला पदावरून हटविण्याचे अधिकार ‘सामना’ला नाहीत," असे सांगत जिल्हाप्रमुखपदी नव्या जोमाने काम करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हस्केंना दिले आहेत. नरेश म्हस्के हे ठाण्यातील मोठं नाव आहे. म्हस्के हे सेनेचे ठाण्यातील आक्रमक नेते आहेत. ठाणे महापालिकेचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com