राज्यातील सत्तापरिवतर्नाबाबत काहीही माहिती नाही

Eknath Shinde-Shiv Sena Latest Marathi News
राज्यातील सत्तापरिवतर्नाबाबत काहीही माहिती नाही
Chandrakant patil Latest Marathi NewsSarkarnama

राज्यातील सत्तापरिवतर्नाबाबत काहीही माहिती नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. प्रस्ताव आल्यास कोअर कमिटीमध्ये निर्णय घेतला जाईल. मी जी भूमिका मांडेन ती पक्षाची अधिकृत भूमिका असेल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मोहित कंबोज यांचे एकनाथ शिंदे हे मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबत माहिती नाही. संजय राऊत हेच शिवसेना संपवत असल्याचे मी यापूर्वीही बोललो आहे. ते सकाळी एक बोलतात आणि नंतर दुसरे, याचा फटका शिवसेनेलाच बसला असल्याचेही पाटील म्हणाले.

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात वाद रंगला आहे. बंडखोर आमदारांवर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पवार यांनी दिल्यानंतर त्याविरोधात राणे यांनी शड्डू ठोकला आहे. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले होते. त्याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पवार यांच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ इंदापूर येथील प्रचारसभेचा आहे. दम देणाऱ्याचे पाय काढले जाईल, असे पवार या व्हिडीओत बोलत आहेत. धमकीवीरांसाठी म्हणून हा व्हीडीओ पोस्ट केल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. 

मुंबई : शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर कारवाई होणारच, असा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्यानंतर त्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रिंगणात उतरले आहेत.

त्यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणतात, ``माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल. संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा. आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही.``

या निमित्ताने राणे यांनी पवारांचे वय काढले आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात धमक्या देऊ नये, असे राणेंनी पवारांना सुचविले आहे.

आम्हीच खरे शिवसैनिक : शिंदे

गुवाहटी : शिवसेनेने बारा बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर त्याला बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांनीही तिखट उत्तर दिले आहे. हे बंडखोर आमदार पक्षाच्या बैठकीला उपस्थित नव्हते, असा दावा करत शिवसेनेने पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरवावे, असा अर्ज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आज रात्री उशिरा केला.

त्याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. या उत्तरात ते म्हणतात,`` कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. बारा आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरांना इशारा देत त्यांनी पक्षांतरबंदी कायद्याच्या विरोधात जाऊन काम केले आहे. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील,असा सज्जड दम दिला होता. तसेच या बंडामागे भाजपच असल्याचा दावा त्यांनी केला होता. पवारांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. बंडखोरांना परत या, असे दुपारी आवाहन केले होते. पवारांच्या वक्तव्यानंतर मात्र सेनेने बंडखोरांवर कारवाईसाठी पावले उचलली.

एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, भारत गोगवाले, संजय शिरसाठ, यामिनी जाधव, अनिल बाबर, लता सोनावणे, तानाजी सावंत, बालाजी किन्हीकर , प्रकाश सुर्वे, महेश शिंदे या 12 आमदारांवर कारवाईची मागणी आज शिवसेनेतर्फे करण्यात आली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या भेटीसाठी खासदार अरविंद सावंत,अनिल देसाई, विद्यमान गटनेते आमदार अजय चौधरी,आणि शिवसेना लीगल सेलची टीम गेली होती. एका आमदाराचे 44 पानांचे अफिडेव्हिडं उपाध्यक्ष यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.

गुवाहटी : एकनाथ शिंदे यांचा जीव आज भांड्यात पडला. कारण कृषीमंत्री दादाजी भुसे आणि आमदार संजय राठोड हे आज गुवाहटी येथील रॅडिसन येथील हाॅटेलवर पोहोचले. हे दोन्ही नेते बंडखोरांच्या गटात सामील होणार असल्याची गेली अनेक दिवस चर्चा होती. मात्र आज रात्री दहाच्या सुमारास ते हाॅटेलवर पोहोचले. हे दोन आमदार आल्यानंतर शिंदे यांच्यासाठी दिलासा आहे. कारण पक्षांतरबंदी कायद्यानुसार फूट पडण्यासाठी दोन तृतीयांश आमदारांची गरज असते. या दोन्ही आमदारांमुळे 37 वर बंडखोरांची संख्या पोहोचली. ही संख्या दोन तृतीयांश एवढी होते. 

Dadaji Bhuse
Dadaji Bhusesarkarnama
Eknath Shinde-Sanjay Rathod
Eknath Shinde-Sanjay RathodSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी या चर्चेत एकनाथ शिंदे किंवा सोडून गेलेल्या आमदारांचे नावही घेतले नाही. ठाकरे हे उद्या (ता. 24 जून) सेना भवन येथे एक वाजता पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

आजच्या बैठकीत बोलताना विभागावर लक्ष द्या. आपण ताकदीने लढू, असे त्यांनी सांगितले. या बैठकीत एकनाथ शिंदे गटाबाबत आणि सोडून गेलेल्या आमदारांबाबत त्यांनी उल्लेख केला नाही.

दुसरीकडे ठाकरेंना पुन्हा मानेचा त्रास जाणवू लागला आहे. स्पाईन सर्जन डॉक्टर मिहीर बापट यांना मातोश्रीवर उपचारासाठी बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री काल वर्षावरून बाहेर निघाले आणि त्यानंतर झालेल्या शक्ती प्रदर्शनामुळे त्यांना पुन्हा एकदा मानेचा त्रास जाणवू लागल्याचे या सूत्रांनी सांगितले.

गुवाहाटी : येथे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांचे आभार मानून त्यांच्याशी संवाद साधला. यामुळे शिंदे यांच्याकडे आता सूत्रे आली आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी ते घेतील तो निर्णय़ मान्य असल्याचे सांगितले. सर्व आमदारांनी हात वर करून त्यास अनुमोदन दिले.  आपण कोणासोबत जायचे याबाबत त्यांनी थेट भाजपचे नाव घेतले असले तरी देशातील एक राष्ट्रीय पक्ष आहे. तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे, तो ऐतिहासिक आहे, असे या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने सांगितले.  ती नॅशनल पार्टी आपल्याला कमी पडू देणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. त्यावर तानाजी सावंत यांनी साहेब, तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू. जे काय सुख, दुःख आहे, ते आपल्या सर्वांचे आहे. 

Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama
eknath shinde
eknath shindesarkarnama

भाजप आमदार संजय कुटे हे उपस्थित असल्याचं माध्यमांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा मोठा नेता, मोठा नेता असं म्हणतं संजय कुटे यांची खिल्ली उडवली. 

Eknath Shinde News, Ajit Pawar Latest News
Eknath Shinde News, Ajit Pawar Latest News Sarkarnama

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामागे अजून भाजपचा रोल दिसत नाही. सध्याच्या परिस्थिती कोणताही भाजपचा मोठा नेता तिथे दिसून येत नाही - अजित पवार 

काही ठिकाणी अशा गोष्टी घडल्या असतील तरी आमदारांना त्रास देणे ही आमची भूमिका नव्हती. तिथे नगरपालिका, जिल्हा परिषद हे राष्ट्रवादीकडे असल्याने निधी देण्यात आला असावा - उपमुख्यमंत्री अजित पवार. 

मित्रपक्षाच्या आमदारांनी केलेले आरोप खोटे. निधीच्या बाबतीत कधीही दुजाभाव केलेला नाही. प्रत्येकाच्या विकासकामांना आपला पाठिंबा असतो. कुठेही निधीला काटछाट केलेली नाही. समोरासमोर बसून हे गैरसमज दूर करता आले असते - उपमुख्यमंत्री अजित पवार. 

महाविकास आघाडी सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचा शेवटपर्यंत पाठिंबा राहिलं. यापेक्षा कोणताही दुसरी भूमिका राष्ट्रवादीची नाही. आम्ही या परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत. मात्र हे सरकार टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न राहिलं - उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रवादी काॅंग्रेस ही महाविकास आघाडी सरकार असेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याची ग्वाही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. पवार यांनी आज आपल्या सहकाऱ्यांशी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक घेऊन चर्चा केली. आजच्या बैठकीत असे अनेक प्रसंग येत जात राहतात याबाबत शरद पवारांनी दाखले दिले. ठाकरे जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी राहणार, अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडली. बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, अशा स्पष्ट शब्दांत पवार यांनी इशारा दिला. हे सरकार टीकावे यासाठी सगळे प्रसत्न आपण करू, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीनंतर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे हात जोडून निघून गेले. सरकार गेल्यावर विरोधातच बसावे लागेल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या आधी माध्यमांशी बोलताना सांगितले.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आमदारांची संख्या वाढत आहे. आज त्यांच्या गटात कृषी मंत्री दादा भुसे, माजी मंत्री संजय राठोड आणि रवींद्र फाटक गुवाहटीमध्ये दाखल झाले आहेत. शिंदे आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत येथे गेल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे गेले होते. मात्र, आता फाटकच शिंदेच्या गोटात गेल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. अर्थात संजय राऊत यांचया म्हणण्यानुसार गुवाहटी येथे गेलेले सारेच आमदार बंडखोर नाहीत. त्यातील काही बंडखोरांना परत आणण्यासाठी देखील गेले आहेत. फाटक हे आता शिंदेंच्या गोटात गेलेत की त्यांना समजाविण्यासाठी, हे लवकरच कळेल. फाटक हे शिवसेनेचे विधान परिषदेतील ठाण्यातील आमदार आहेत. त्यांचे आणि शिंदे यांचे आधीपासूनच सख्य आहे. सत्ता स्थापनेसाठी विधानसभेतील आमदार महत्वाचे ठरतात. पण या निमित्ताने विधान परिषदेतील आमदारही शिंदे यांच्या गळाला लागला आहे, असे सांगण्यात येत आहे. 

Ravindra Phatak, Dada Bhuse, Sanjay Rathod
Ravindra Phatak, Dada Bhuse, Sanjay Rathodsarkarnama
Trinamool Congress Latest Marathi News
Trinamool Congress Latest Marathi Newssarkarnama

गुवाहाटी : महाराष्ट्राच्या राजकीय गोंधळात आता तृणमूल काँग्रेसने प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदारांचा मुक्काम असलेल्या गुवाहाटीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) वतीने निदर्शने करण्यात आली. हॉटेलबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपविरोधी (BJP) घोषणाबाजी केली. आमदारांचा घोडेबाजार आहे, तो थांबवावा, अशा घोषणा त्यांनी दिल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. आसाम तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष रिपुन बोरा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी आसामचे भाजप सरकार आपली सर्व संसाधने वापरत असल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. एकीकडे राज्यातील पुराचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दुसरीकडे सरकार या राजकीय उलथापालथीत गुंतले आहे, असे तृणमूल काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

Deepak Kesarkar Latest News, Ashish Jaiswal News
Deepak Kesarkar Latest News, Ashish Jaiswal NewsSarkarnama

गुवाहटी येथे आज सकाळी बंडखोरांना जाऊन मिळालेले शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आणि अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी खळबळ उडवून दिली होती. ते आज सकाळी हाॅटेलवर पोहोचले पण दुपारी दोघेही हाॅटेलमधून बाहेर पडले. त्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली होती. या दोघांनी बंडखोरीतून माघार घेतली की काय, असे बोलण्यात येत होते. पण प्रत्यक्षात ते दोघे खरेदीसाठी बाहेर पडले होते. ते दोघे आता पुन्हा हाॅटेलवर परतल्याने शिंदे गटाला हायसे वाटले.  

सत्तेच्या खेळात राष्ट्रवादी काॅंग्रेसचा एक गट उतरल्याची बातमी `टीव्ही 9` ने दिली आहे. `सरकारनामा`ने या बातमीची खातरजमा केलेली नाही. या वृत्तानुसार राष्ट्रवादी काॅंग्रेसचा एक गट भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र भाजपने यास फारसा प्रतिसाद दिला नसल्याचेही यात म्हटले आहे.

असे असेल तर बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा पेच असू शकतो. राष्ट्रवादी काॅंग्रेसने 2014 मध्ये भाजपला स्वतःहून पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शिवसेनेचे महत्व कमी झाले होते. तसेच भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या निर्णयामुळे झाल्याचा दावा नंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सध्याच्या खेळीमुळे एकनाथ शिंदे यांचे महत्व कमी होऊ शकते.

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमची विरोधात बसण्याची तयारी असल्यचाे सांगितले होते. त्यानंतरही राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील चर्चेच्या बातम्या येत आहेत. राजकारणात काहीही घडू शकते, त्यामुळे सध्या राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते, हे सांगता येत नाही.

ncp
ncpsarkarnama

राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर पोलीस सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी माजी मंत्री परिणय फुके यांच्या पुढाकाराने फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये केला प्रवेश.

Devendra Fadnavis, Parinay Phuke
Devendra Fadnavis, Parinay Phukesarkarnama

एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदार आले आहेत. पक्षांतरबंदी कायद्याच्या मर्यादेच्या पुढे ही संख्या गेल्याने कारवाईची भीती आता सरली आहे. 

1) एकनाथ शिंदे 2) अनिल बाबर 3) शंभूराजे देसाई 4) महेश शिंदे 5) शहाजी पाटील 6) महेंद्र थोरवे 7) भरतशेठ गोगावले 8) महेंद्र दळवी 9) प्रकाश अबिटकर 10) डॉ. बालाजी किणीकर 11) ज्ञानराज चौगुले 12) प्रा. रमेश बोरनारे 13) तानाजी सावंत 14) संदीपान भुमरे 15) अब्दुल सत्तार नबी 16)प्रकाश सुर्वे 17) बालाजी कल्याणकर 18) संजय शिरसाठ 19) प्रदीप जयस्वाल 20) संजय  रायमुलकर 21) संजय गायकवाड 22) विश्वनाथ भोईर 23) शांताराम मोरे 24) श्रीनिवास वनगा 25) किशोरअप्पा पाटील 26) सुहास कांदे 27) चिमणआबा पाटील 28) सौ. लता सोनावणे 29) प्रताप सरनाईक 30) सौ. यामिनी जाधव 31) योगेश कदम 32) गुलाबराव पाटील 33) मंगेश कुडाळकर 34) सदा सरवणकर 35) दीपक केसरकर 36) दादा भुसे 37) संजय राठोड अपक्ष आमदार 1) बच्चू कडू 2) राजकुमार पटेल 3) राजेंद्र यड्रावकर 4) चंद्रकांत पाटील 5) नरेंद्र भोंडेकर 6) किशोर जोरगेवार 7) सौ.मंजुळा गावित 8) विनोद अग्रवाल 9) सौ. गीता जैन

आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी शेवटपर्यंत  : जयंत पाटील                 महाविकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे- राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर गटांच्या ताब्यातून सुटलेल्या दोन आमदारांनी आज माध्यमांसमोर त्यांच्यावर आलेल्या संकटाची माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी एकनाथ शिंदे गटाला आवाहन केले. संजय राऊत म्हणाले, "शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी," " बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवा," असे आवाहन राऊत यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Key Events

1) एकनाथ शिंदे 2) अनिल बाबर 3) शंभूराजे देसाई 4) महेश शिंदे 5) शहाजी पाटील 6) महेंद्र थोरवे 7) भरतशेठ गोगावले 8) महेंद्र दळवी 9) प्रकाश अबिटकर 10) डॉ. बालाजी किणीकर 11) ज्ञानराज चौगुले 12) प्रा. रमेश बोरनारे 13) तानाजी सावंत 14) संदीपान भुमरे 15) अब्दुल सत्तार नबी 16)प्रकाश सुर्वे 17) बालाजी कल्याणकर 18) संजय शिरसाठ 19) प्रदीप जयस्वाल 20) संजय  रायमुलकर 21) संजय गायकवाड 22) विश्वनाथ भोईर 23) शांताराम मोरे 24) श्रीनिवास वनगा 25) किशोरअप्पा पाटील 26) सुहास कांदे 27) चिमणआबा पाटील 28) सौ. लता सोनावणे 29) प्रताप सरनाईक 30) सौ. यामिनी जाधव 31) योगेश कदम 32) गुलाबराव पाटील 33) मंगेश कुडाळकर 34) सदा सरवणकर 35) दीपक केसरकर 36) दादा भुसे 37) संजय राठोड अपक्ष आमदार 1) बच्चू कडू 2) राजकुमार पटेल 3) राजेंद्र यड्रावकर 4) चंद्रकांत पाटील 5) नरेंद्र भोंडेकर 6) किशोर जोरगेवार 7) सौ.मंजुळा गावित 8) विनोद अग्रवाल 9) सौ. गीता जैन

Related Stories

No stories found.