एकनाथ शिंदे अमित शहांना फडणवीसांच्या अनुपस्थितीत रात्रीच गुपचूप भेटले...

Eknath Shinde|Amit Shah : मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असे आधी सांगण्यात आले होते.
Amit Saha, Eknath Shinde Latest News,
Amit Saha, Eknath Shinde Latest News,Sarkarnama

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून त्यांचे दिल्ली दौरे चांगलेच वाढले आहेत.

दरम्यान, शिंदे यांनी माध्यमांना गुंगारा देत बुधवारी (ता २७ जुलै) पुन्हा दिल्ली गाठली असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असे आधी सांगण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ते दिल्लीसाठी रवाना झाले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. (Amit Saha, Eknath Shinde Latest News)

Amit Saha, Eknath Shinde Latest News,
पंकजा मुंडे, धनंजय मु्ंडे, पाचपुतेंसह राष्ट्रवादीच्या तीन तर कॅाग्रेसच्या एका नेत्याला नोटीस...

मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि 1 ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी या दोन्ही मुद्द्यांवर या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. या चर्चेत शिंदे यांनी आपल्या गटासाठी 18 मंत्रिपद देण्यात यावी, अशी मागणी शहांकडे केली आहे. कोर्टाच्या निकालानंतर लगेचच मंत्रीमंडळ विस्तार करावा लागेल, असेही शिंदेंनी शहांना बोलल्याची माहिती मिळत आहे. यानंतर शिंदे हे रात्री साडेतीनच्या सुमारास दिल्लीतून मुंबईत परतल्याचे समजते.

Amit Saha, Eknath Shinde Latest News,
शिवसेनेला सोलापूरात पुन्हा धक्का; शहाजीबापू पाठोपाठ कोकाटे अन् क्षीरसागरही शिंदे गटात

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंचा हा पाचवा दिल्ली दौरा होता. राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन सुमारे महिना होत आहे. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असून विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. गेल्या आठवड्यातच हा विस्तार होईल, अशी चर्चा होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि इतर काही कारणांमुळे विस्तार रखडल्याचं बोललं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in