एकनाथ शिंदेंनी 72 तासांनंतर ओपन केले पत्ते!

Eknath Shinde लवकरच भाजपबरोबर (BJP) सत्तास्थापनेचा दावा करु शकतात
Eknath Shinde Latest Marathi News, Political Crisis in Maharashtra, Shivsena News
Eknath Shinde Latest Marathi News, Political Crisis in Maharashtra, Shivsena Newssarkarnama

गुवाहाटी : एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठींबा असल्याचे शिवसेनेचे (ShivSena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज आमदारांना सांगत आपले पत्ते ओपन केले. त्यांनी पक्षाचे नाव घेतले नसले तरी त्यांना भाजपसोबत जायचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एकमताने गटनेतेपदी निवड केली. त्यानंतर आमदरांशी बोलताना त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. आपल्याला कुठेही काहीही कमी पडणार नाही,असे शिंदे यांनी आमदारांना सांगितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह शिंदे गुवाहाटीमधील हॅाटेलमध्ये बोलत होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, कुठेही काही लागले तरी कमी पडणार नाही, असा शब्द राष्ट्रीय पक्षाने दिला आहे. आता फक्त एकजुटीने राहयचे. आपले सगळ्यांचे सुख, दु:ख सारखेच आहे. विजय आपलाच आहे, असे शिंदे म्हणाले. तो पक्ष महाशक्ती आहे. पाकिस्तानला त्यांनी धडा शिकवला आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले. (Political Crisis in Maharashtra)

Eknath Shinde Latest Marathi News, Political Crisis in Maharashtra, Shivsena News
पुन्हा एक धक्का : भाजपची युती होणार राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत ?

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Congress) भाजपला (BJP) या प्रकरणात क्लीन चिट दिला असतानाच दुसरीकडे शिंदे यांनी मात्र, राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याची कबुली दिली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नाव घेतले नाही. त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा उल्लेख केला. तसेच त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे लवकरच शिंदे भाजपबरोबर सत्तास्थापनेचा दावा करु शकतात.

Eknath Shinde Latest Marathi News, Political Crisis in Maharashtra, Shivsena News
दिघेंचा शिष्य गुवाहाटीत तर पुतण्याने जोडले समाधीला हात

राज्यातील राजकीय घडामोडीला सध्या वेग आला आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत राजकीय भूकंप झाला. शिंदे यांच्यासोबत जवळपास ४२ पेक्षा जास्त आमदार आहेत. शिवसेना आणि शिंदे गट असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. आमदारांसोबतच सेनेचे खासदारही शिंदेच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com