बसमधून उतरलेले एकनाथ शिंदे परतले; शिवसेना आमदारांचा जीव भांड्यात

Shivsena | BJP : काल एकनाथ शिंदे अचानक बसमधून उतरल्याने खळबळ उडाली होती.
Eknath Shinde News, Rajya Sabha election 2022 News Updates
Eknath Shinde News, Rajya Sabha election 2022 News UpdatesSarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election 2022) कोणताही धोका पत्करायचा नाही, असे धोरण ठेवून शिवसेना आमदारांना (Shiv sena) मडमधल्या 'रिट्रीट' मध्ये ठेवण्यात आले आहे. आज त्यांना पुन्हा हॉटेल ट्रायडंटमध्ये हलवण्यात येणार आहे. मात्र या दरम्यान रिट्रीटला जाताना बसमधून अर्ध्या वाटेत उतरलेले शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Ekntah Shinde) आता पुन्हा आमदारांसोबत मुक्काम करण्यासाठी परतले आहेत. काल रात्री पर्यंत एकनाथ शिंदे आमदारांसोबत राहणार नसल्याची चर्चा होती. पण शिंदे यांनाही आमदारांसोबतच रहावे लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (Eknath Shinde News)

राज्यसभा निवडणुकीसाठी आमदार फोडाफोडीच्या राजकारणाने शिवसेनेने आमदारांना ट्रायडंटऐवजी रिट्रीटमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. काल शिवसेना आमदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक संपताच त्यांना बसमधून थेट मडच्या दिशेने धाडण्यात आले. त्यातील एका बसमध्ये पहिल्याच सीटवर एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर बसले होते. मात्र, दिवसभरात सतत बैठकांत असलेल्या शिंदे आणि नार्वेकर यांच्यात बसमध्येच चर्चा झाली.

Eknath Shinde News, Rajya Sabha election 2022 News Updates
एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांच्या बसमधून उरतले...

परंतु, एकनाथ शिंदे आणि नार्वेकर अचानक बसमधून उतरल्याने ते का उतरले अशी चर्चा रंगली होती. त्यावर गेली चार दिवस परदेशात असलेल्या नार्वेकरांसोबत चर्चा करण्यासाठी ते बसमधून उतरले असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, पक्षाचा नेता म्हणून शिंदे हे आमदारांसोबत राहणे अपेक्षित असल्याने सी लिंक परिसरातील 'एमएसआरडीसी'च्या गेस्ट हाऊसमध्ये नार्वेकरांसोबत बोलणे आटोपून शिंदे रिट्रीटकडे रवाना झाले, त्यामुळे शिवसेना आमदारांचा जीव भांड्यात पडला आहे.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार देऊन तो निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ताकद लावली आहे. गेल्या दोन दिवसांत ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर स्वपक्षाच्या आमदारांना सोमवारीच वर्षावर बोलावून ठाकरे चर्चा केली. ही बैठक संपल्यानंतर आमदारांना रिट्रीटकडे पाठविण्यात आले.

Eknath Shinde News, Rajya Sabha election 2022 News Updates
महाजन लागले कामाला; हितेंद्र ठाकुरांकडून शब्द घेवूनच 'बविआ'चे कार्यालय सोडले

जुन्या नियोजनानुसार शिवसेनेच्या आमदारांना बुधवारपासून म्हणजे, ८ जूनला मुंबईत बोलावून, त्याच दिवसापासून 'ट्रायडंट'मध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, ट्रायडंटमध्ये धोका होऊ शकतो, असा अंदाज बांधून ठाकरे यांनी आपल्या इतरत्र हलविण्याचा निर्णय घेतला.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आम्हाला निवडणुकीचे टेन्शन नाही. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. पण ही एक स्ट्रेटजी आहे. काही आमदार कपडे घेण्यासाठी गेले आहेत ते पण येतील, आम्हाला टेंशन नाही तुम्हीही टेंशन घेऊ नका. मतदान करण्यासाठी म्हणून हे सर्व आमदार एकत्र ठेवले आहेत.अपक्ष आमदार ही आमच्या सोबत आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com