'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी शिंदेंची दिल्लीवारी ; सहकारी मंत्र्यांसोबत निवडणूक आयोगासमोर परेड ?

eknath shinde : महाराष्ट्र सदनाबाहेर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक झळकले आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (बुधवारी ) दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे (eknath shinde) शिवसेनेच्या इतर राज्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाबाहेर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक झळकले आहेत.

जीएसटी बैठकीसाठी ते जाणार असल्याचा दुजोरा शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी दिला आहे. तर दुसरीकडे धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे निवडणूक आयोगासमोर (election commission)आमदारांना हजर करून त्यांचे समर्थन असल्याचे ​​​​​​दाखवून देणार आहेत,असे समजते.

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणत्या गटाकडे राहील, हे प्रकरण निवडणूक आयोगापुढे आहे. त्यामुळे 'आमदारांचे समर्थन लेखी पत्राद्वारे नको, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळवायचे असेल तर समर्थन असलेल्या आमदारांनाच हजर करा,' असे म्हणणे निवडणूक आयोगाचे आहे, त्यामुळेच आता शिंदे गट दिल्लीवारीसाठी सज्ज झाला आहे. आमदारांसोबतच शिंदे गटाचे काही खासदार देखील दिल्लीला जाणार आहेत.

Eknath Shinde
RBI : रुपी बँकेला आरबीआयकडून कायमचं टाळं ; परवाना रद्द

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार, उद्योगमंत्री उदय सामंत व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे दिल्लीत दाखल होणार आहेत. हे आमदार व खासदार खरी शिवसेना असल्याचे आणखी काही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करणार असल्याचे समजते.

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाबाहेर देखील दिल्लीचे शिवसेना राज्यप्रमुख संदीप चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताच्या नावाचे पोस्टर लावले आहेत. मुख्यमंत्री आज या पदाधिकाऱ्यांची दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात भेट घेणार आहेत. या भेटीनंतर मुख्यमंत्री आपली भूमिका या पदाधिकाऱ्यांसमोर मांडणार आहेत. त्यामुळं आता राज्याबाहेरील शिवसैनिक कोणासोबत जाणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

वैष्णव, गडकरींची भेट घेणार

केंद्रीय रेल्वे, माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याही मुख्यमंत्री शिंदे भेट घेणार आहेत. राज्यातील समृद्धी महामार्ग व इतर महामार्गांच्या कामांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com