Eknath Shinde On Thackeray : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येतील का? मुख्यमंत्री म्हणाले...

Eknath Shinde On Uddhav Thackeray : सत्तासंघर्ष निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिंदे एकत्र येतील का?
Eknath Shinde On Uddhav  Thackeray :
Eknath Shinde On Uddhav Thackeray : Sarkarnama

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला आता पुढच्या महिन्यात वर्षभराचा कालावधी पूर्ण होईल. मागील अकरा महिन्यात शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये रस्त्यावरच्या संघर्षाबाबत न्यायालयीन संघर्ष सुरू आहे. मात्र असे असले तरी अजूनही महाराष्ट्रातील अनेकांना वाटतं की, शिंदे आणि ठाकरे पुन्हा कधी एकत्र येतील का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Eknath Shinde On Uddhav  Thackeray :
Sharad Pawar Withdraw Resignation: शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याचं 'हे' आहे खरं कारण!

आज एका खासगी वृत्तवाहिनीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मुलाखत घेतली या मुलाखत घेतली होती. या विशेष मुलाखतीत शिंदेंनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मुख्यमत्री शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला की,'तुम्ही जे कुटुंब (ठाकरे गट शिवसेना) सोडलंय. तुम्हाला आता वाटत नाही का? कि पुन्हा 'मातोश्री'वर जावं. त्यांना पुन्हा समजावावं, त्यांना आपल्या सोबत घ्यावं, असं तुम्हाला वाटत नाही का? कारण अनेक वर्षांचं तुमचं नातं होतं?' असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला.

Eknath Shinde On Uddhav  Thackeray :
Prakash Ambedkar News: 2024 पर्यंत काय होणार हे फक्त मोदी आणि शाहच ठरवतील; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आता संपूर्ण महाराष्ट्र माझं परिवार झालेला आहे. समजावण्याचा विषय असेल तर, मी हा निर्णय घेण्यापूर्वी ठाकरेंना पाच ते सहा वेळा समजावण्याचा प्रयत्न केला होता," असे शिंदे म्हणाले. यामुळे शिंदे ठाकरे गट एकत्र येण्याची चिन्हे अद्याप तरी दिसत नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com