ठाकरे आता थेट भिडले; आधी बारा अन् आता आणखी पाच आमदारांवर अपात्रतेचे संकट

शिवसेनेकडून नरहरी झिरवळ यांना कारवाई करण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं आहे.
Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गटाला थेट भिडले आहेत. सुरूवातीला त्यांनी शिंदे यांची गटनेता पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर गुरूवारी बारा आमदारांचे निलंब करण्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिले होते. आता आणखी पाच आमदारांना निलंबित करण्याची मागणी सेनेकडून उपाध्यक्षकांकडे केली आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)

शिवसेनेतील बंडाच्या नाट्यातील दुसऱ्या अंकाची ही सुरूवात आहे. सुरूवातीला शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न करण्यात आले. पण त्यानंतरही शिंदे माघार घेण्यास तयार नसल्याने आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.

Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
Eknath Shinde Live Update : शिंदे गटाचा प्लॅन ठरला; राज्यपाल आणि विधानसभा उपाध्यक्षांकडे घेणार धाव

शिंदे यांच्या गटात असलेल्या सुमारे 40 आमदारांपैकी 12 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र सेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले आहे. बारा बंडखोर आमदारांवर पक्षाचा ‘व्हीप’ डावलल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले आहे.

त्यानंतर आता शुक्रवारी त्यामध्ये आणखी पाच आमदारांची भर पडली आहे. सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे यांचे निलंबन करण्याची मागणी सेनेकडून करण्यात आल्याचे समजते.

Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
वरिष्ठांच्या आदेशानुसारच गुवाहाटीत! गीता जैन यांचे वरिष्ठ कोण? चर्चांना आलं उधाण

गुरूवारी एकनाथ शिंदे, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, लता सोनवणे, अनिल बाबर, बालाजी किणीकर, तानाजी सावंत आणि प्रकाश सुर्वे यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com