शिवसेनेला मोठा झटका ; राष्ट्रवादीवर आरोप करुन जिल्हाप्रमुखाचा सेनेला 'जय महाराष्ट्र'

अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.
Udhav Thackeray, naresh mhaske
Udhav Thackeray, naresh mhaskesarkarnama

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी काल (शनिवारी) ठाण्यात (Thane) मोठं शक्तीप्रदर्शन केलं. या शक्तीप्रदर्शनानंतर काही तासातच टि्वट करीत ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी (naresh mhaske) शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. (shiv sena leader naresh mhaske resigns)

"अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र!", असं नरेश म्हस्के यांनी टि्वट केलं आहे. म्हस्के यांच्या राजीनाम्यानंतर ठाण्यात शिवसेनेला आणखी भगदाड पडेल, अशी चर्चा सुरु आहे.

"भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा..जात, गोत्र अन् धर्म अमुचा... शिवसेना, शिवसेना, शिवसेना...! शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच.. पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र!",असे टि्वट म्हस्के यांनी केलं आहे. महिन्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यांना सर्व परिस्थिती सांगितली होती, आता पुन्हा त्यांना भेटण्यात काही अर्थ नाही, असे म्हस्के म्हणाले.

शिवसेनेचे ठाण्यातील आक्रमक नेते म्हणून म्हस्के यांची ओळख आहे, ठाणे महापालिकेचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा त्यांनी राजीनामा दिल्याने ठाण्यातील कार्यकर्त्यांची नाराजी उघड झाली आहे.

Udhav Thackeray, naresh mhaske
कब तक छीपोगे गोहातीमे, आना हि पडेगा चौपाटीमे ; झिरवाळांचा फोटो पोस्ट करुन राऊतांचा टोला

ठाण्यातील सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे आहेत हे यातून दिसून येत आहे. काल श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनात ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्ते जमले होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भाषण केलं. श्रीकांत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसवर (Congress) गंभीर आरोप केला.

अडीच वर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न झाला. विशेषत: राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेच्या आमदारांना जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in