सोमय्यांच्या 'डर्टी डझन'मधील दोन आमदार भाजपला चालतील का?

एकनाथ शिंदे आणि भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्याचे समजते.
Kirit Somaiya Latest Marathi News, Political Crisis in Maharashtra
Kirit Somaiya Latest Marathi News, Political Crisis in Maharashtra Sarkarnama

मुंबई : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे इतर आमदारांना सोबत घेऊन भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. हिंदुत्व तसेच महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. याच भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आघाडीतील आमदार, मंत्र्यांना लक्ष्य करणाऱे भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणत असलेल्या 'डर्टी डझन' यादीतील दोन आमदार सध्या शिंदे गटात आहेत. (Eknath shinde Latest News)

किरीट सोमय्या यांच्याकडून मागील अडीच वर्षांत आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, अजित पवार, अनिल परब, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बारा नेत्यांचा समावेश आहे. या बारा नेत्यांचा ते डर्टी डझन असा उल्लेख करतात.

Kirit Somaiya Latest Marathi News, Political Crisis in Maharashtra
उद्धवसाहेब, तुमचे बडवे आम्हाला ताटकळत ठेवायचे! आमदार संजय शिरसाट यांचं खरमरीत पत्र

बारा नेत्यांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश आहे. त्यामध्ये यशवंत जाधव व त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव आणि प्रताप सरनाईक यांचाही समावेश आहे. तसेच खासदार भावना गवळी यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हे तिघेही सध्या शिंदे यांच्या गटाच्या भूमिकेच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहेत. (Kirit Somaiya Latest Marathi News)

यामिनी जाधव आणि प्रताप सरनाईक यांच्यावर सोमय्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेतेही सातत्याने निशाणा साधत होते. आता शिंदे गट आणि भाजपने एकत्रितपणे सत्तेत येण्याचा निर्णय घेतल्यास भाजप या दोन आमदारांनाही सत्तेचे संरक्षण देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Kirit Somaiya Latest Marathi News, Political Crisis in Maharashtra
उद्धव ठाकरेंकडे उरले दोन कॅबिनेट मंत्र्यांसह केवळ पंधरा आमदार! ही नावं पक्की...

सोमय्यांकडूनच सरनाईक व जाधवांची तक्रार

यशवंत जाधव (Yashwant Jadhav) हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) 'फंड कलेक्टर' असल्याची टीका सोमय्या यांनी केली होती. यशवंत जाधव आणि यामिनी यशवंत (Yashwant Jadhav) यांनी २४ महिन्यात मुंबईत ३६ बिल्डिंग विकत घेतल्या. त्यांच्याकडे इतकी संपत्ती तर त्यांच्या नेत्यांकडे किती संपत्ती असणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. सक्तवसुली संचालनालय, आयकर विभाग आणि कंपनी विभागाकडून या सगळ्यांची चौकशी केली जाईल. यामध्ये तब्बल १००० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा दावाही सोमय्यांनी केला होता.

प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचा 18 कोटींची दंड राज्य सरकारने माफ केला आहे. ठाणे येथील छाबय्या विहंग गार्डन इमारतीतील बेकायदा बांधकामाबद्दल सरनाईक यांच्या कंपनीला ठाणे महापालिकेने दंड ठोठावला होता. या निर्णयाविरोधात सोमय्या यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचप्रमाणे सरनाईक आणि त्याचा भागीदार आस्था बिल्डर्सने एनएसईएल घोटाळ्यात २१६ कोटी रुपये ढापले होते. यापैकी २५ कोटी रुपये प्रताप सरनाईक यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. याच पैशातून प्रताप सरनाईक यांनी टिटवाळा येथे भूखंड खरेदी केला. ईडीने या प्रकरणात कारवाई केली आहे. २०१३ मध्ये मी एनएसईएल घोटाळा प्रकरणात जनहित याचिका दाखल केली होती. हा एकूण ५६०० कोटी रुपयांचा घोटाळा असून यामध्ये १३०० गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, असे सोमय्या यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com