आकडे जुळले; आशिष जयस्वाल, केसरकरांसह आणखी चार आमदार गुवाहाटीत

एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची संख्या वाढत चालली आहे.
Eknath Shinde Latest Marathi News, Eknath Shinde in Guwahati
Eknath Shinde Latest Marathi News, Eknath Shinde in GuwahatiSarkarnama

मुंबई : शिवसेनेतील बंडखोर आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरूवारी सकाळी आणखी चार आमदार गुवाहाटीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये अपक्ष आमदार आशिष जयस्वाल, दीपक केसरकर, सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर यांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुंबईतील आमदारांनीही ठाकरेंना आव्हान दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Ekanath Shinde Latest News)

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदार एकत्रित आले आहेत. शिंदे समर्थक आमदारांनी बुधवारी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर चार अपक्षांसह 34 आमदारांच्या सह्या होत्या. त्यानंतर जवळपास दहा ते अकरा आमदार गुवाहाटीत दाखल झाले आहेत. त्यामुळे शिंदे समर्थक आमदारांची संख्या वाढतच चालली आहे.

Eknath Shinde Latest Marathi News, Eknath Shinde in Guwahati
शिंदेंची ताकद वाढतच चाललीय; बारा खासदारही ठाकरेंची साथ सोडणार?

गुरूवारी सकाळी शिवसेना (Shiv Sena) समर्थक रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) हेही गुवाहाटीत दाखल झाले. त्यांनी मागील काही दिवसांत महाविकास आघाडीबाबत नाराजी व्यक्त केली होती. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही राष्ट्रवादीवर निशाणा साधत शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे एक दिवसापूर्वीच सांगितले होते. तेही सकाळी शिंदे गटात सामील झाले.

मुंबईतील आमदार ठाकरे यांची साथ सोडणार नाहीत, असं सांगितलं जात होतं. पण सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर यांनीही शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. आता शिंदे गटाकडील शिवसेनेतील आमदारांची संख्या 41 पोहचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांचा वेगळा गट करण्याचा शिंदे यांचा मार्ग मोकळा झाला असून त्यावर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde Latest Marathi News, Eknath Shinde in Guwahati
शिंदे गटाने विलीन व्हावे आणि मगच सरकार! भाजपने अट घातल्याचा आंबेडकरांचा दावा

दरम्यान, कुडाळकर यांनी आपण गुवाहटीला जाणार असल्याचे बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. आज सकाळपर्यंत माझा विचार गुवाहाटीला जाण्याचा नव्हता, मात्र काही कारणाने जावे लागत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कुडाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते, त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. सरवणकर हे देखील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांचेही बंडखोर गटाला जाऊन मिळणे, हे शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com