शिंदे-फडणविसांच्या जोडीला बारा मंत्री मिळणार; पाच ऑगस्ट, सायंकाळी सहा वाजता शपथविधी

Eknath Shinde गटाचे पाच मंत्री शपथ घेण्याची शक्यता
Eknath Shinde Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : शिंदे सरकारच्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारासाठी येत्या शुक्रवारीचा (ता. ५) मुहूर्त सापडल्याचे समजत असून, त्यामुळे राज्याला आणखी बारा मंत्री मिळण्याची आशा आहे. बंडखोर सोळा आमदारांची अपात्रता, शिवसेनेच्या चिन्हाचा वाद हा न्यायालयीन प्रक्रियेत असून त्यावर अद्याप निर्णय आलेला नाही. यावर आता गुरूवारी सकाळी लवकर सुनावणी होणार आहे.

Eknath Shinde Latest Marathi News
ZP Election चे गणित शिंदे-फडणविसांनी पुन्हा बदलले; गट-गणांची संख्या घटवली..

पहिल्या टप्प्यात भाजपचे सात आणि शिंदे गटातील पाच अशा १२ मंत्र्यांना सामावून घेतले जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी कोण शपथ घेणार, याची उत्सुकता सत्ताधारी पक्षांच्या आमदारांत आहेत. या मुहूर्तावर शपथविधी झाल्यास मंत्र्यांविना सरकारच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde Latest Marathi News
Eknath Shinde गटाचे काय होणार? : हरिश साळवे यांच्यावर आता अखेरची भिस्त!

राज्यात भाजप आणि बंडखोर गटाचे सरकार स्थापन होऊन सव्वा महिना झाला तरी मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. शिवसेना आणि बंडखोरांमधील वादासंदर्भात न्यायालयाच्या निकालामुळे मंत्रीमंडळ विस्तार करण्यात अडचणी असल्याचे बोलले गेले. लवकरच विस्तार होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. तरीही, एवढ्या दिवसांत ते शक्य झाले नाही. त्यात आता पुन्हा पाच ऑगस्टचा मुहूर्त सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in