गटनेते पदावरील शिंदेंचा दावा कायम राहणार? संख्याबळ ठरणार सरस

एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
गटनेते पदावरील शिंदेंचा दावा कायम राहणार? संख्याबळ ठरणार सरस
MLA Ajay Chaudhary Latest News, Eknath Shinde Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिलं मोठं पाऊल उचललं. शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. त्यांच्याजागी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण तांत्रिक कारणांमुळे शिंदे यांचा गटनेते पदावरील दावा कायम राहण्याची शक्यता आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)

एकनाथ शिंदे हे तब्बल 35 आमदारांसह सुरतमध्ये असल्याची चर्चा आहे. हे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून (Shiv Sena) पावलं उचलली जात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही प्रमुख नेते व आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याचा ठराव मांडण्यात आला होता.

MLA Ajay Chaudhary Latest News, Eknath Shinde Latest Marathi News
दहा तासांत एकनाथ शिंदे अनेकदा रश्मी ठाकरेंशी बोलले!

ठरावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पण या ठरावावर केवळ 16 आमदारांच्याच सह्या असल्याचे समजते. तर एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी 35 आमदार असल्याचे समजते. त्यामुळे जवळपास दोन तृतियांश आमदार शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांचे गटनेतेपद शाबूत राहू सकते.

तांत्रिकतृष्ट्या शिंदे यांच्याकडील संख्याबळ सरस ठरते. याबाबत त्यांनी या आमदारांच्या सह्यांचे पत्र विधानभवनाकडे दिल्यास ते गटनेतेपदी कायम राहू शकतात. त्यामुळे शिवसेनेकडून चौधरी यांच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असली तरी ठरावार पुरेशा आमदारांच्या सह्या नसल्याने तांत्रिक मुद्दा उपस्थित होऊ शकतो.

MLA Ajay Chaudhary Latest News, Eknath Shinde Latest Marathi News
शिंदेंसोबत असलेल्या नऊ आमदारांच्या अपहरणाची कुटुंबीयांकडून तक्रार! मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर

दरम्यान, एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी ठाकरेंचे निटकवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि आमदार रविंद्र फाटक हे सुरतमध्ये दाखल झाले आहेत. शिंदे आणि इतर आमदार असलेल्या हॉटेलमध्ये ते पोहचल्याची माहिती आहे. त्यामुळे आता त्यांच्यात चर्चा होईल. यातून आता काय निष्पन्न होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in